मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या अवैधरीत्या दारू विक्रेत्यावर विविध ठिकाणी धाडी ,खेड्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे , ३,४१,३६० रूपायांचा देशी विदेशी दारू
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.०३ मंठा पोलीसांची स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी धाडी टाकुन देशी,विदेशी दारू व इंडिगो वाहानासह तीन आरोपींना अटक करण्यात आले.
सविस्तर बातमी अशी कि, मंठा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हाॅटेल अण्णा येथुन ८०० रू.किमतीच्या भिंगरी संञा दारूच्या १० बाटल्या जप्त करण्यात आले. हाॅटेल मालक नामे गजानन काशीनाथ डोईफोडे रा सरहद वडगांव ता मंठा पोलीस अमलदार सुभाष राठोड यांच्या फिर्यादिवरून मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले.व तसेच मंठा ते तळणी रोडवर वैष्णवी हाॅटेलच्या समोर दारूची अवैध वाहतुक करतांना रंगनाथ उर्फ पिनु अंकुश राठोड रा दहिफळ खंदारे यांच्या कडुन २४०० किमतीच्या मॅकडाॅल नं -१ कंपनीची १२ बाटल्या जप्त करण्यात आले .व पोउपनि बालभिम राऊत यांच्या फिर्यादिवरुन मंठा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले.
तसेच मंगेश नारायण जाधव रा जांभरून ता.मंठा हा व्यक्ति त्याच्याकडिल टाटा इंडिगो कंपनीच्या गाडी मध्ये ७२००रू किंमतीच्या इम्प्रियल ब्ल्यु कंपनीच्या विदेशी दारूच्या ४८ बाटल्या व ३९६०रू किंमतीच्या कॅनाॅन १००० कंपनीच्या २४ बाटल्या व ५७,६००रू किंमतीच्या देशी दारू भिंगरीच्या ९६०बाटल्या व १४,४००रू किंमतीच्या टॅंगो प्रिमियम कंपनीच्या २४० बाटल्या ,२,५५,०००रू किमतीची एक पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो कंपनीची गाडी असा एकुण ३,३८,१६० रूपायाचा मुद्देमाल सरस्वती मंगलकार्यालय समोर अवैध देशी विदेशी दारूची वाहातुक करतांना मिळुन आल्याने सदरील मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर पोलीस अमलदार राजाळे यांच्या फिर्यादिवरून मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
असा एकुण ३,४१,३६०रू मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदरील कारवाई ही मा.पो.अधिक्षक रागसुधा मॅडम,मा.अप्पर पो.अधिक्षक श्री.विक्रांत देशमुख मा.पो.उपविभागीय अधिकारी श्री राजु मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरीक्षक संजयजी देशमुख,पो.उपनिरीक्षक बालभिम राऊत पो. उपनिरीक्षक आसमान शिंदे,पो हे काॅं शंकर राजाळे पो हे काॅं ढवळे,पो हे काॅं सुभाष राठोड,पो काॅं शाम गायके,पो काॅं आमटे,पो धोडके,पो दिपक आढे,पो मांगीलाल राठोड, पो काॅं मनोज काळे,पो बनकर,पो काॅं जुंबडे,पो इलग,पो आनंद ढवळे, पो काॅं खरात यांनी केली.