स्वच्छता अभियानात सर्वात मोठा वाटा हा जैन समाजाचा आमदार लोणीकर यांचे प्रतिपादन,गोहत्या बंद व्हावी यासाठी जैन समाजाचे मोठे योगदान आमदार लोणीकर,आमदार लोणीकर यांनी भाषणाला गोमाता च्या जयजयकाराने केली सुरुवात
प्रतिनिधी समाधान खरात
जैन समाजाला हिंदुत्ववादी समाज असून गेल्या अनेक वर्षापासून जैन समाजाने गोहत्या बंदीसाठी रस्त्यावर उतरून योगदान दिले आहे गोहत्या बंद व्हावी यासाठी नेहमीच या समाजाने प्रयत्न केला आहे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती रामनाथजी कोविंद, तंत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना भेटून सुद्धा वेळोवेळी गोहत्या बंदीची मागणी जैन समाजाने केली आहेत स्वच्छता सारख्या कामात ही जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे मी स्वच्छता खात्याचा मंत्री असताना जैन समाज मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियानात सहभागी झाला होता असे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली यांच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की
मी पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचा मंत्री असताना महाराष्ट्रात 18000 गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आणि 70 लाख स्वच्छतागृह बांधले हे काम करत असताना जैन समाजातील अनेकांची मदत झाली असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की जैन समाजाचा शालीन शांत व सुसंस्कृत समाज असून राज्याच्या व देशाच्या विकासामध्ये या समाजाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे
पुढे बोलताना ते म्हणाले की या समाजाने देशाच्या आर्थिक उन्नती मध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावलेला असून या समाजाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे नियमितपणे होत असतात असेही यावेळी आमदार लोणीकर यांनी आवर्जून सांगितले सामाजिक दायित्व निभावत असताना हा समाज आर्थिक दृष्ट्या दुर्बल यांना मदत करण्यासाठी सदैव पुढाकार घेणारा समाज म्हणून या समाजाकडे पाहिले जाते असेही यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
यावेळी राजेशजी टोपे - पालकमंत्री जालना, आ.कैलास गोरंट्याल, आनंदमलजी छल्लाणी जैन - राष्ट्रीय अध्यक्ष अशोक मेहता जैन - कार्यध्यक्ष, राजीवजी जैन - राष्ट्रीय कार्यकारी महामंत्री पद्मचंदजी कांकरीया जैन -कोषाध्यक्ष , विरेंद्र धोका जैन - संयोजक सदस्य , आनंदजी सुराणा जैन - राष्ट्रीय प्रचार प्रसार मंत्री, राजेश लुणिया जैन - सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात देशभरातील जैन समाज बांधव सहभागी झाले होते...!!