लोकमाता अहिल्याबाई होळकर धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या-बाळासाहेब सोनसळे


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
लोकमाता अहिल्याबाई होळकर धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या त्यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजाला देऊन मानवता हा एकच धर्म आहे
        .असा संदेश दिला असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते बाळासाहेब सोनसळे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान मित्र मंडळ पिंपरी धामणगाव तालुका परतुर जिल्हा जालना. आयोजित राजमाता अहिल्याबाई होळकर सार्व जनिक जन्मोत्सव प्रसंगी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय संस्कृतीचे विचारधारा जोपासत संपूर्ण भारतभर स्वतःच्या खाजगी कोशातून यांनी सर्व समाजासाठी लोककल्याणकारी राज्यकारभार केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात अहिल्या ज्योतीचे संपादक रमेश आढाव बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष बापू गोसावी रासपचे नेते शिवाजी तरवटे क्रांती संघाचे हनुमान दौंडे युवा व्याख्याते गोविंद गोचडे, नंदकुमार गांजे, हातकडके सर, दत्ता कोल्हे ,इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. महापुरुषांचे प्रतिमापूजन भव्य मिरवणूक व महापुरुषांच्या विचारांचा जागर करत गावातील महिला ज्येष्ठ नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे अध्यक्ष संचालक तरुण युवक-युवती यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला यावेळी रामप्रसाद थोरात रमेश आढाव यांनी समयोचित भाषणे केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन काळे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष लखन काळे, सचिव विठ्ठल काळे, तसेच सर्व पदाधिकारी व गावातील युवकांनी सहकार्य केले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात