रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, हजारोच्या संख्येने उपस्थित रहा*- दादराव दौंडे

 परतूर/ प्रतिनिधी समाधान खरात
 रिपब्लिकन सेना (अनंदराज अंबेडकर ) जालना जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन दिनांक २८ जून २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजन जालना जिल्हा अध्यक्ष दिनेशभाई आदमाने व लिंबाजी वाहुळकर यांच्या नेतृत्वा खाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
    सदर मोर्चा अंबड चौफुली येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असून मोर्चातील विविध मागण्या खालील प्रमाणे १)राज्यातील महागाई वाढल्यामुळे रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेची रक्कम ग्रामीण भागासाठी १लाख ३८ हजारावरून २लाख ५० हजार एवढी वाढविण्यात यावी व शहरी भागासाठी ३ लाख रुपये करण्यात यावी. २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहीर वाटप करण्यात यावे, या योजनेमध्ये भु -र्जल सर्वक्षण विभागाकडून पाणी पातळी कमी दाखविण्यात येते या कारणामुळे काही गावातील मागासवर्गीय शेतकऱ्यांचे विहीरी रद्द झाल्या आहेत ,भु-जल विभागाने घातलेल्या अटी रद्द करण्यात याव्यात.३) जिल्ह्यातील गायरान जमिनी कसणाऱ्या कास्तकरी यांच्या नावे ७/१२ करण्यात यावे ४) बहुतांश गावात अनुसूचित जाती व बहुजनांची घरे आहेत त्यांना स्वतंत्र स्मशान भूमी देखील आहे परंतु त्यांची ७/१२ नोंद नसल्याने अनेक ठिकाणी अंत्यसंस्काराच्या वेळेस वाद होतो त्यामुळे स्मशान भूमिची ७/१२ वर नोंद करण्यात यावी.५) संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या जाचक अटी रद्द करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. ६) आष्टी येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासाठी जागेचा नमुना ८ देण्यात यावा. ९) जालना जिल्ह्यातील जुगार, मटका, दारू, रेती ,अवैद धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. १०) परतुर रेल्वे गेट येथे होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम जलद गतीने तात्काळ करून जनतेसाठी खुला करण्यात यावा. या व आदी मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे परतुर तालुका संघटक दादाराव दौंडे तालुका अध्यक्ष जयपाल भालके शहराध्यक्ष गौतम पानवाले , उपाध्यक्ष प्रभाकर मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....