सीटी हॉस्पिटल कडुन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप...

परतुर प्रतिनिधी: हनुमंत दवंडे 
     Bतालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री .समर्थ माध्यमिक विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना परतूर येथील प्रसिद्ध अस्थी रोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड व स्त्री रोग तज्ञ डॉ.संध्या कराड यांच्या वतिने दरवर्षी गरजू व होतकरू
 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
        या वर्षी त्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्ये प्रदान केले. या बाबत बोलताना डॉ. म्हणाले की समाजामध्ये आज ही असे विद्यार्थी आहेत कि ते शैक्षणिक साहित्ये खरेदी करू शकत नाहीत.त्यामुळे ते विद्यार्थी शाळाबाह्य होतात अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे.भविष्यात या योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले . .
        शाळेचे सहशिक्षक पाराजी रोकडे व सी.एन.खवल यांच्या कडे पुस्तकांचे संच सुपूर्द करण्यात आले.गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना डॉ.कराड दरवर्षी मदत करतात यांमुळे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर , महामंत्री राहूल लोणीकर सचिव गंगाधर काळे , उपाध्यक्ष संभाजीराव खवल व मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर ,शिक्षक गाडेकर ,खवल , सातपुते , कुलकर्णी जोशी ,ही.एन. खवल ,डवरे ,शंकर खरात , गणेश वखरे यांच्यासह अनेकांनी आभार मानले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....