शिवसेना वाहनचालक मालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख रामजी सोळंके यांची नियुक्ती
परतूर प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शिवसेना वाहन चालक मालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख पदी रामजी बापूराव सोळंके यांची नियुक्ती पत्राद्वारे दि ४ जून २०२२ रोजी तालुकाप्रमुख अशोक आघाव यांनी केली आहे. नियुक्तीचे पत्र माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐजे बोराडे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन स्व. बाबासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेना युवासेनाचे ध्येय धोरण गोरगरीब जनतेला फायदा होईल. असे काम करून शिवसेना पक्ष वाढीस कामे करावे. या नियुक्तीबद्दल माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐजे बोराडे, पंडित भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम, अशोक आघाव, रामेश्वर नळगे, महेश नळगे, सुदर्शन सोळंके, विकास खरात, संदीप पाचारे, संजय गोंडगे, दीपक हिवाळे, अनंता बागल, राहुल कदम, दत्ता सुरुंग, अबासाहेब कदम, मधुकर पाईकराव, गजानन सोळंके, आदींनी अभिनंदन केले आहे.
*फोटो ओळी.. शिवसेना वाहन चालकमालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख पदी रामजी सोळंके यांना नियुक्ती पत्र देतांना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐ. जे बोराडे, आदि,*