केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान असलेले नॅरोगेज पटेल ची जागा शेगाव पंढरपुर दिंडी मार्गाला पूर्ण करण्यासाठी द्यावी या मागणीसाठी भेट घेतली,शेगाव पंढरपूर दिंडी मार्गा संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झाली सकारात्मक चर्चा-आमदार बबनराव लोणीकर
प्रतिनिधी समाधान खरात
शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी संत गजानन महाराजांच्या शेगावात पासून ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर पर्यंत हा महामार्ग मंजूर करून घेतला होता या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चे काम बंद असलेल्या नॅरोगेज रेल्वे पटरी मुळे अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही त्यामुळे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जुनाट झालेली पटरी पण आवश्यक ती अस्तित्वात नाही त्याचबरोबर या ठिकाणाहून रेल्वेचे आवागमन ही होत नसल्यामुळे ही जागा शेगाव पंढरपूर दिंडी मार्गासाठी द्यावी या संदर्भामध्ये चर्चा केली
या संदर्भामध्ये दिंडी मार्गाची पार्श्वभूमी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या लक्षात आणून देत हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यानची रेल्वेची जमीन देण्याची मागणी यावेळी केली
या चर्चेदरम्यान अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भामध्ये आमदार लोणीकर यांना या संदर्भामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले
त्यामुळे उर्वरित बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यानच्या शेगाव पंढरपुर दिंडी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल असा आशावाद आमदार लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला
तात्कालीन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत विदर्भ मराठवाड्यातील वारकऱ्यांना स्वच्छ व सुंदर महामार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर पाठपुरावा केला होता मंत्री नितिन गडकरी यांनी लोणीकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले होते व जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघांमधील वाटुर येथे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते तो मार्ग आता अंतिम टप्प्यात असून बार्शी कुर्डूवाडी दरम्यान चे काम पूर्ण झाल्यास हा रस्ता पूर्णत्वास जाणार आहे