सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथे रक्तदान शिबिर,पाचशे रक्तदाते रक्तदान करणार- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,रक्तदान करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लोणीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात येणार ड्रेस वाटप1000 विद्यार्थ्यांना करण्यात येणार वाटप


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असताना तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणतीही बॅनर बाजी पोस्टरबाजी जाहिरात बाजी न करण्याचे राज्याचे विकासप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी ठरवले असून सेवा समर्पण सप्तांतर्गत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 22 जुलै 2022 रोजी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतुर येथील जनसंपर्क कार्यालयावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर हजार शाळकरी गरजूवंत विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, रक्तदान हे श्रेष्ठदान असून मागील कोरोना महामारीच्या काळात भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून हजारो रक्त पेशव्यांचा संकलन करण्यात आलं होतं महामहीम पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देखील सेवा सप्ताह दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अगदी त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले अलौकिक नेतृत्व असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी पोस्टरबाजी फाटा देत समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले असून परतूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची पत्रकात नमूद करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात 500 पेक्षा अधिक युवा कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले

परतूर विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती श्री लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे परतूर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अनेक सक्रिय कार्यकर्ते यासह युवा कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करावा असे आवाहनही आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये केले आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागील कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र राज्याला विकासाच्या पातळीवर अतिशय उंचीवर नेऊन ठेवले असून विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेली समाज हिताचे निर्णय हे राज्याच्या आर्थिक विकासावर व सामाजिक विकासावर दुरागामी परिणाम करणारे असल्याचे पत्रकार नमूद करण्यात आले असून रक्तदान शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....