उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथे 500 रक्तदात्यांचे रक्तदान,देवेंद्रजींच्या दीर्घायुष्यासाठी लोणीकरांची परतुरातील महादेव मंदिरात महाआरती,पागरी गोसावी ता.मंठा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 200 गणवेश ( ड्रेस ) वाटप


प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य असून राज्यसभेच्या तीन व विधान परिषदेच्या 5 जागा निवडून आणण्याचे अशक्यप्राय असणारे काम त्यांनी पूर्ण करून दाखवले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जे भल्याभल्यांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले त्यामुळेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याला लाभलेले अलौकिक नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याने विकास कामामध्ये कात टाकली असून महाराष्ट्रातील विकासाचा रथ जोमाने सुरू आहे मागील पंचवार्षिक मध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळात महाराष्ट्रातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केल आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले 


मागील पंचवार्षिक मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या पथावर घेऊन जात असताना देवेंद्रजींनी राज्याच्या विकासासाठी अनेक योजना अमलात आणल्या त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांबरोबरच सर्वसामान्य दिलासा देणाऱ्या योजनाही देवेंद्रजी च्या माध्यमातून या राज्यांमध्ये सुरू झाल्या *मागील पाच वर्षात अतिवृष्टी, पिक विमा,चक्रिवादळ, दुष्काळ  महापुर , कर्जमाफी अश्या संकटात शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी रु टाकणारे 70 वर्षाच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस होते.* पुन्हा एकदा देवेंद्रजी च्या खांद्यावर महाराष्ट्राची जबाबदारी येऊन पडली असून मुख्यमंत्री पदाचा त्याग करत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी निर्णयाचा धडाका लावला असून ओबीसी आरक्षणासारखा जटिल प्रश्न केवळ सरकार स्थापनेनंतर वीस दिवसात सोडवण्याची किमया देवेंद्रजी यांनी करून दाखवली. मागील त्यांच्या कार्य काळामध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण मिळवून दिले मात्र आघाडी सरकार सत्तेत येतात सरकारला ते सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही मात्र पुन्हा एकदा राज्यात युतीची सत्ता येताच जनसामान्यांच्या अशा पल्लवी झाले असून निश्चितच मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा जनसामान्य मराठा समाजातून व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे योजना राबवत जलयुक्त शिवार सारखी महत्त्वपूर्ण योजना सुरू करून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचा देवेंद्रजी यांचा प्रयत्न आज सफल झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे मराठवाड्याची तहान भागवी यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना राबवत मराठवाड्यातील पिण्याचे पाणी शेतीसाठी पाणी व उद्योग धंद्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या माध्यमातून करण्यात आला होता असेही पुढे बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले

आज परतूर येथे देवेंद्रजींचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करीत 500 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवल्याचा आपणास आनंद असून देवेंद्रजीवर प्रेम करणाऱ्यांची संख्या राज्यभरात  प्रचंड प्रमाणात आहे हेच यातून स्पष्ट होते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी जालना व अमृता ब्लड सेंटर छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते महादेव मंदिरामध्ये जाऊन महाआरती करण्यात आली असून देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम 12 कोटी जनतेचे कल्याण व्हावं, सेवा व्हावी अशी प्रार्थना लोणीकर यांनी भगवान शंकराच्या चरणी केली 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा करताना बॅनर पोस्टर यासारख्या गोष्टींना फाटा देत थेट मदतीचा हात पुढे करून सेवा समर्पण कार्य करा अशा सूचना दिल्या होत्या या सूचनेवर अंमल करीत परतुर विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पांगरी गोसावी येथील आश्रम शाळेमध्ये जाऊन 200 विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप केले असल्याचे सांगतानाच देवेंद्रजीची कारकीर्द अशीच बहरत राहो अशी सदिच्छा यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली यावेळी रक्तदाते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
=====================
*कोविड काळात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार*
======================
कोविड काळामध्ये अनेकांनी गरजू रुग्णांना मदतीसाठी पुढाकार घेतला होता अनेक अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा  न करता स्वतःला झोकून देत दिन दलित गोरगरीब कामगार कष्टकरी शेतकरी अशा सर्व वर्गातील जनसामान्यांची सेवा करणाऱ्या सेवाकर्मींचा सत्कार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजप प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यामध्ये डॉ.नवल डॉ.आकात डॉ. प्रधान पोलीस निरीक्षक कोठाळे रमेश भापकर शत्रुघ्न कणसे संपत टकले गजानन उफाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला

*आणीबाणीमधील लोकतंत्र सेनानी यांच्यातर्फे लोणीकरांचा सत्कार*
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानी यांना दिली जाणारी पेन्शन रद्द करण्यात आली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सर्व स्वातंत्र्यसेनानींनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यामार्फत ती पेन्शन पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी निवेदन देऊन प्रयत्न करण्याची विनंती केली होती त्या प्रयत्नांना यश मिळाले असून या सर्व लोकतंत्र सेनानींना पुन्हा पेन्शन मंजूर करण्यात आली आहे त्यानिमित्त या सर्व लोकतंत्र सेनानी आज लोणीकरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रघुनाथ दीक्षित निवृत्ती मते सुमंत पुरी अंकुशराव पवार सुभद्राबाई धोत्रे मोहन भोजने अंकांना शेवाळे त्रिंबक मुळे द्वारकादास मंत्री अरुण उपाध्ये यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

परतूर येथे भाजप व भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने आयोजित  रक्तदान शिबिर, पांगरी गोसावी येथे गरजू विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप तर महादेव मंदिर येथे आयोजित महाआरती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर परतुर भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर जिल्हा परिषद सदस्य पंजाब बोराडे सतीश निर्वळ हरिराम माने शहाजी राक्षे शत्रुघ्न कणसे संपत टकले रामप्रसाद थोरात संदीप बाहेकर कृष्णा आरगडे सुधाकर बापू सातोनकर प्रकाश चव्हाण गजानन उफाड विक्रम उफाड रवी सोळंके सिद्धेश्वर सोळंके माऊली सोळंके गजानन लोणीकर बबलू सातपुते अविनाश राठोड शिवाजी पाईकराव दिगंबर मुजमुले रामेश्वर तनपुरे रंगनाथ येवले प्रदीप ढवळे शिवाजी भेंडाळकर गजानन लिपणे जालिंदर राठोड पवन केंदळे दारासिंग चव्हाण अशोक राठोड बंडू मानवतकर सर्जेराव आघाव गोरख गाडगे पद्माकर कवडे बाबाराव थोरात कोमल कुचेरिया समाधान वाघमारे प्रमोद भालेकर संजय काळे सईद शेख ज्ञानेश्वर जैत सोनू अग्रवाल संतोष हिवाळे रामकिसन बोडखे अभिजीत कोदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती..!

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....