दहावी सीबीएस ई परीक्षेत श्रद्धा शर्माचे 94% गुण मिळवीत घवघवीत यश
परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे
येथील विवेकानंद इंग्लिश स्कुल ची विद्यर्थिनी पत्रकार ऍड.केदार ज.शर्मा यांची कन्या कु.श्रद्धा हिने आज जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९४.२०% गुण मिळवीत घवघवीत यश मिळविले.
तिच्या यशाचे श्रेय तिने आपले आई वडील, शाळेचे शिक्षक व ज्ञानदीप फाउंडेशन सेंटरचे संचालक काबरा सर व इतर शिक्षक वृंदांना दिली आहे तिच्या यशाबद्दल तिचे माजी मंत्री बबनराव लोणीकर, नगराध्यक्षा विमालताई जेथलिया, राहुलभैया लोणीकर, प्रकाशराव सोळंके, काबरा सर, शाळेचे संचालक संदीप बाहेकर शिक्षक वृंद, पत्रकार अजय देसाई, बालाजी ढोबळे, शामसुंदर चित्तोड, राजकुमार भारूका, कैलास सोळंके, माणिक जैस्वाल आदींसह मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.