प्रहारच्या मागणीला यश-अशोक तनपुरे
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर येथे ग्रामीण रुग्णालय येथे प्रहार संघटनेच्या वतीने विविध निवेदन आंदोलन केले परतूर येथे ग्रामीण रुग्णालयात अपंगासाठी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी याकरिता दोन वर्षापासून संघर्ष चालू होता तरी या मागणीला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल यांनी अपंग तपासणी व प्रमाणपत्र या मागणीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परतूर येथे दुसरा शनिवार व चौथा शनिवार अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी अपंग तपासणी व प्रमाणपत्र मान्यता दिली यामध्ये अस्थिव्यंग व अल्पदृष्टी या तपासणीला मान्यता दिली यामुळे तालुक्यातील अपंग बांधवांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही यामुळे अपंग बांधवांचे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरता मोठे आर्थिक व वेळही जाणार नाही याबद्दल अशोक तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ ज्ञानदेव नवल तसेच जिल्हा रुग्णालयाचे तज्ञ डॉ भगत यांचे आभार मानले