देवर्षी संगीत विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती गीतांच्या कार्यक्रम संपन्न

परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त परतूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे विठ्ठल आवडी प्रेमभाव हा अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. देवर्षी संगीत विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्राध्यापक रामेश्वर नरवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष होते. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस अशा भक्तीगीताचे आणि सुप्रसिद्ध अभंगाचे सादरीकरण केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष  रामेश्वर अण्णा नळगे उद्घाटक   कपिल आकात सभापती कृउबा समिती   ज्ञानेश्वर काळे संस्थापक अध्यक्ष अर्बन बँक प्रमुख पाहुणे  माजी प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे, जेष्ठ नगरसेवक अंकुश  तेलगड, विनायकराव काळे, विजय राखे, बाबासाहेब तेलगड, गटसमन्वक  कल्याण बागल, प्राचार्य शंकरराव चव्हाळ, लायन्स क्लबचे  मनोहरराव खालापुरे, शाम तेलगड, माजी सैनिक प्रशांत पुरी, जिजाऊ ब्रिगेड च्या अर्चना तनपुरे, सौ, वर्षा पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अभंगवाणी कार्यक्रमाचे प्रायोजक युवा नेते महेश नळगे, विशाल पवार, आकर्षण फुटवेअरचे विनोद जईद, पाटील पेंट्स चे संदीप पाटील, डॉ. दीपक दिरंगे, नगरसेवक, प्रकाश चव्हाण,  बाबासाहेब लहाने उपस्थित होते. 
                         सुरुवातीला आरुष बहीवाल, अन्वी चव्हाळ, पार्थ रायमुळे, समृद्धी खैरे, साईराज डव्हारे या बाल कलाकारांनी शारदा स्तवन आणि प्रार्थनेने मान्यवर मंडळींची मने जिंकून घेतली. 
 तद्नंतर अमृता नरवडे हिने या पंढरपूरात काय वाजत गाजत, हर्षिता मुंडदा हिने जगी जीवनाचे सार, करुणा मालपाणी च्या कानडा राजा पंढरीचा, पंढरीचा विठ्ठल कुणी पहिला हे भक्तीगीत उदय पारीक,यश काकडे,तेजस लोमटे या तिघांनी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.

 संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत निळोबाराया आदि संतांनी वर्णन केलेल्या अभंगावर इतर विद्यार्थ्यांनी आपली गायन सेवा प्रस्तुत केली, त्यामध्ये
दिपाली कुलकर्णी चा बोलवा विठल, वैष्णवी वाकडे चा अवघे गरजे पंढरपूर,सौ.शारदा राजबिंडे यांचा झणी दृष्टि लागो, सौ.ज्योती खैरे यांचा पाऊले चालती पंढरीचि वाट तसेच सानिका आष्टेकर, विष्णु भांबरगे, मनोज वंजारे, यांच्या अर्थपूर्ण अभंगांनी कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. वादक साथीदार म्हणून माऊली भांबरगे, व्यंकटेश व्यास, विष्णु पावले यांनी काम बघितल. सूत्र संचालन सौ.लंका भवर आणि सौ. आकांक्षा नरवडे यांनी केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....