आष्टी येथे स्वर्गीय दत्तात्रय (नाना) शामराव लोणीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शिबिर , राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन,गरजू रुग्णांचा शिबिराला मोठा प्रतिसाद
परतुर प्रतिनीधी हनुमंत दवंडे
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल मेडिकल अँड रिसर्च सेंटर च्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांचे आजोबा स्वर्गीय दत्तात्रय नाना शामराव लोणीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आष्टी तालुका परतुर येथे संपन्न झाले
या शिबिराचे उद्घाटन युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की माझ्या आजोबाच्या स्मरणार्थ आनंद ऋषी हॉस्पिटल ने या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना नेत्र तपासणी ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा आपणास आनंदा असून आष्टी व परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने हे शिबिर वरदान ठरणार असल्याचे यावेळी बोलताना राहुल लोणीकर यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागामध्ये अनेकांना उपचारासाठी शहरात जाणे व उपचार करून घेणे परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर मस्के यांनी अत्यल्प दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची जबाबदारी घेतली असून या माध्यमातून गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार आहे
या शिबिराच्या माध्यमातून आपण सर्वांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर मस्के यांना सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करीत आहे व माझ्या आजोबाच्या स्मृती प्रित्यर्थ शिबिर ठेवणारे डॉक्टर मस्के यांचा मी अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो असे गौरवोद्गार यावेळी राहुल लोणीकर यांनी काढले
यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्यासह शिबिर संयोजक डॉक्टर मस्के पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात माजी सरपंच बाबाराव थोरात कृष्णा टेकाळे गजानन लोणीकर महादेव वाघमारे बबलू सातपुते रवी सोळंके मधुकर मोरे अनंत आगलावे अमोल जोशी सिद्धेश्वर केकान हबीब शेख राहुल तौर अशोक चव्हाण कृष्णा मोठे उद्धव गुंजाळ नंदकुमार गांजे उत्तमराव चौरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व रुग्णांची उपस्थिती होती