मंठा येथील कन्या शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेखलाल भाई तर उपाध्यक्ष आशपाक शेख
मंठा प्रतिनिधी सुभाष वायळ
दि.२५ बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते त्यानुसार आज दिं २५ जुलाई २२ सोमवार रोजी मंठा येथील कन्या शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची पालक बैठक बोलवण्यात आली होती.
त्यानुसार सर्वानुमते सर्व रीतसर प्रक्रिया पुर्ण करत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेखलाल भाई तर उपाध्यक्षपदी आशपाक शेख यांची निवड करण्यात आली.तर सदस्यपदी फेरोज अन्वर शेख,सय्यद अल्ताफ युसुफ, सत्यदीप नंदकिशोर प्रधान, अश्विनी संतोष धाबे,खाटिक शाहिन जावेद,शमीम युसुफ बागवान, समीना तोफिक बागवान, या समितीने सर्वांना असा विश्वास दिला की, शालेय गुणवत्ता वाढवने व मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे. व शालेय व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता यावी. शाळाबाह्य व अपंग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षकांच्या समस्याचे निराकरण करणे व त्यांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे,शालेय विकास आराखडा तयार करणे, या सर्व गोष्टीवर भर देऊन निश्चितच शालेय गुणवत्ता वाढवू अशी हमी दिली. समीती निवडिच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री धोत्रे सर होते तर मुख्याध्यापक श्री ए टी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले व श्री व्हावळ सर जायभाये सर व गोंडगे सर,जवळेकर मॅडम,राखे मॅडम , श्रीरक्षागर मॅडम,व थोरात मॅडम यांनी सहकार्य केले. तर ग्रामस्थ,पालक, यांनी अभिनंदन केले. तसेच यावेळी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक गावकरी,पालक, उपस्थित होते.