सय्यद वसीम व मित्र मंडळाच्या वतीने पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार....
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे
अनेक वेळा चांगले कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव झालेले तसे कमी पाहण्यात येथे याला अपवाद आहे शहरातील एआईएमआयएम चे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांच्या वतीने शहराची साफसफाई करणाऱ्या पालिका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
झाले असे की मागील आठवड्यात आषाढी एकादशि व बकरी ईद हे महत्वाचे सण साजरे करण्यात आले या सणाच्या काळात शहरातील विविध भागांतील स्वच्छता करून आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून देणाऱ्या पालिका कर्मचारी यांनी मुख्याधिकारी सुधीर गवळी व स्वच्छता अभियंता प्रमोद घाटेकर ,निरीक्षक रवी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई केली
याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आला होता याबाबतची दखल घेत सय्यद वसीम व त्यांच्या मित्रमंडळी यांनी दिनांक 17 जुलै रोजी पालिकेत जाऊन सफाई कामगार यांचा सत्कार केला
यावेळी सय्यद रहेमान,इसा अन्सारी,नईम भाई,शेख हसन,रज्जाक कुरेशी,नजीब काजी,शेख आसेफ,अनिल पारीख यांच्यासह पालिकेतील सफाई कामगार व अन्य कर्मचारी उपस्थित होते.