जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाचे सरपंच परिषदेकडून स्वागत योग्य निर्णय..... घोडेबाजाराला चाप- शत्रुघ्न कणसे पाटील


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे

 ग्रामपंचायतींवर सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिवसेना - भाजप युती सरकारने 3 जुलै 2017 रोजी घेतला होता . मात्र महाविकास आघाडी सरकारने जानेवारी 2020 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय रद्द करीत पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंच निवड करावी असा निर्णय 25 फेब्रुवारी 2020 महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करून , सरपंचाची निवड सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता
परत नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने दिनांक 14 जुलै रोजी निर्णय घेतला की यापुढे नगराध्यक्ष व सरपंच निवड ही थेट जनतेतूनच होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या वतीने करण्यात येत आहे.
सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे पाटील यांनी स्वागत करतांना सांगितले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व मा.जि.परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या माध्यमातून नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारकडे सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र राजे भोसले व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली वायाळ यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवड व्हावी म्हणून मागणी केली होती 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय पुन्हा लागू केल्याने येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील उमेदवाराची निवड होणार असून या निर्णयामुळे गावा गावात होणारा घोडेबाजाराला ही चाप बसणार असून यासोबतच राज्यातील अनेक गावांत वादविवाद होऊन याचे परिमाण अनेकांना भोगावे लागत असल्याने हा निर्णय अपेक्षित असतांना हा निर्णय घेण्यात आल्याने गाव गाड्यात समाजसेवा करणाऱ्या योग्य उमेदवाराला न्याय मिळण्याची अशा उंचावली असल्याचे ही यावेळी श्री कणसे यांनी सांगितले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....