शेतकर्या साठी नेहमी झटणारे आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या- अरुण खराबे पाटील.
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
मंठा येथील अरुण खराबे पाटील यांनी परतूर मंठा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांना मंत्रिमंडळामध्ये परत एकदा मंत्री मंडळामध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे गेल्या अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती. ही जबाबदारी बबनराव लोणीकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे पार पाडून पाणीपुरवठा योजनेच नातं जिवंत करण्याचे काम त्यांच्या हातून झालेला आहे
सतत दुष्काळात भरपळत असलेला मराठवाडा यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न त्यांनी केले असून परतूर मंठा तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्या हातून विविध विकास कामे झालेली आहेत.तसेच नेहमी शेतकरी, कष्टकरी साठी आ. लोणिकर हे प्रयन्तशिल आसतात प्रत्येकाच्या सुखदुःखाला हजर असणाऱ्या व चार ते पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आलेले आमदार बबनराव लोणीकर यांचा पुन्हा एकदा मंत्री मंडळात समावेश व्हावा याकरीता मंठा तालूक्याततिल हेलस या गावा मधे श्री संत बोडखे महाराज यांनी जीवंत समाधी घेतली होती अरुण खराबे पाटील यांनी श्री संत बोडखे महाराज यांच्या चरणि प्रार्थना केली आहे की मा. आ. बबनराव लोणीकर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे तसेच परतुर मंठा मतदार संघातील तमाम जनतेची मागणी असल्याचे अरुण खराबे पाटील यांनी सांगितले..