मुख्यमंत्री वैद्यकीय आरोग्य सहाय्यता कक्ष" पुन्हा सुरु, सामान्य व गरजू रूग्णांना मिळणार मोठा आधार - प्रा. सहदेव मोरे पाटील,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्यासह कक्ष सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आ. लोणीकरांचे मानले आभार
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
मागील पंचवार्षिकमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उप मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला "मुख्यमंत्री वैद्यकीय आरोग्य सहाय्यता कक्ष" पुन्हा सुरु करणे अत्यन्त आवश्यक होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेकांनी हा कक्ष सुरु करण्याबाबत वारंवार विनंती केली होती, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही केली नाही अनेक रुग्णाच्या वारंवार या कक्षाकडे अनेकदा येरझरा सुरु असायच्या परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परंतु हिंदुत्वाचा विचार घेऊन पुन्हा एकदा भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आलं आणि हा कक्ष पुन्हा सुरु झाला याचा मनस्वी आनंद असून सामान्य व गरजू रुग्णांना यामुळे मोठा आधार मिळणार असल्याचे भाजपा जालना ग्रामीण तालुका सरचिटणीस प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी यावेळी सांगितले.
"मुख्यमंत्री वैद्यकीय आरोग्य सहाय्यता कक्ष" सुरु करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, मा.उप मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मा.आ.श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्यासह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे सर्वसामान्य गरजू रुग्णांच्या वतीने प्रा सहदेव मोरे पाटील यांनी आभार असून पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातील आर्थिक अडचणीतील रुग्णांना पुन्हा नव्याने मदत होणार आहे. वैद्यकीय आरोग्य सहाय्यता कक्ष सुरु करणे हा अत्यंत तातडीचा विषय असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. परंतु आता राज्यातील हजारो रुग्णांच्या समस्याचा अंत झाला आहे. हजारो दुर्धर आजाराच्या गरीब रुग्णांना उपचार मिळतील असेही प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे काम पुर्णत: ठप्प झाल्याने गरजू रूग्णांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत होते त्यामुळे आशेचा किरण असणाऱ्या या कक्षाकडे राज्यातील अनेक गरजू कुटुंबियांच्या नजरा लागलेल्या होत्या. ती प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली असून गरजू रुग्णांना नव्याने मदत मिळणार आहे. काही रूग्णांना तातडीची आर्थिक मदत हवी असते अशावेळी त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजूंच्या अनेक आजांरावर आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे, समान्य रूग्णांना मोठा आधार मिळेल असेही प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी यावेळी सांगितले.