कोरेगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


परतूर -- प्रतिनिधी हनुमंत दंवडे
तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी सोनाजी तुकाराम खरात वय 50 वर्ष यांनी दि 3 जुलै रोजी रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतात झाडाला गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
शेतकरी सोनाजी खरात याना कोरेगाव येथे तीन एकर जमीन आहे.  पंधरा दिवसापूर्वी बी बियाणेसाठी पैशाची आवश्यकता असल्याने बैलजोडी विक्री केली. त्यातून आलेल्या पैशातून बी बियाणे खरेदी केली तर काही खाजगी व्यवहार केले. शेतात पुढील खर्च पैसे नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ने आर्थिक विवंचनेत होते. तसेच बँकेचे दोन लाख रुपये घेतलेले कर्ज थकले होते.  कर्ज थकले असल्याने कर्ज कसे फिटनार निसर्गाचा लहरीपणा असल्याने कर्जबाजारीपणा व आर्थिक अडचणींमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.  या घटनेची नोंद परतूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

या बाबत पुढील तपास पोलीस नाईक नितीन कोकणे हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू, असा परिवार आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....