परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न....
परतूर,/प्रतिनिधी हनुमंत दवंडे
वंचित बहुजन आघाडीची आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकी संदर्भात शासकीय विश्राम गृह , परतूर येथे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये परतूर नगर पालिकेच्या सर्व वॉर्ड मध्ये उमेदवार उभे करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
जिल्हाअध्यक्ष भालचंद्र भोजने यांनी सर्व कार्यकर्त्यांना झटून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. गरजवंत लोकांना रेशकार्ड मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित होताच लवकरच तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले . या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते चोखाजी सौदर्य, जालना जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, डॉ किशोर त्रिभुवन,जिल्हा महासचिव शाफिक आत्तार, जिल्हा संघटक हनुमंत मोरे, माजी जिल्हा अध्यक्ष गौतम खंडागळे,मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव,सुरेश काळे शहर अध्यक्ष राहुल नाटकर, उपाध्यक्ष बाळू कदम , संघटक प्रदीप साळवे, महासचिव रामा कोयते, सचिव दीपक कचरू हिवाळे, सहसंघटक प्रशांत वाकळे,सल्लागार अशोक ठोके, परतुर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे,शोएब पठाण, उत्तम साळवे, तालुका महासचिव प्रकाश मस्के, संतोष झरेकर, पमु पाईकराव संजय वाघमारे, आकाश मुंढे,पी.सी.खरात,संदीप मोरे,उत्तम साळवे, गुलाबराव बचाटे, मनोज वंजारे, काऱ्हाला गावचे सरपंच अविनाश खरात, सुभाष खरात तसेच वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते .