जालना जिल्ह्यात टवाळखोरांना आवर घाला, मनसे विद्यार्थी सेनेची मागणी



जालना: प्रतिनिधी समाधान खरात 
       जुन महिन्यात राज्यातील काॅलेज महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थी तरुणीं या काॅलेज व महाविद्यालयात रस्त्याने पायी तर काही विद्यार्थींनी सायकल, स्कुटी, बसने जाणं येणं करत आसतात. तसेच जालना शहरात व जिल्ह्यात काॅलेज, विद्यालयाबाहेर टवाळखोरांची झुंबड ऊडतांना दिसुन येत आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. 
     या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे जालना पोलीस अधिक्षक डाॅ.अक्षय शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जालना जिल्हा व शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा आशी मागणी केली आहे. तसेट टवाळखोर व गुन्हेगार वृत्तीच्या विद्यार्थ्यांना काॅलेज महाविद्यालयात प्रवेश देऊ नये. आसी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी सुरवातीपासुनच जालना जिल्हा शिक्षण विभागाकडे लाऊन धरली होती. पण काॅलेज, व महाविद्यालय व्यवस्थापकांवर दबाव टाकून व दहशत निर्माण करुन टवाळखोरांनी प्रवेश मिळवला आसल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. टवाळखोर हे शिक्षणसाठी काॅलेज मध्ये येत नसतात. तर? धिंगा मस्ती करण्यासाठीच येत असुन जालना जिल्ह्यातील व शहरातील मुलींना मनमोकळे शिक्षण घेता यावे. आसे सिद्धेश्वर काकडे यांनी जालना पोलिस अधिक्षक यांच्याकडे ग्रहाणे मांडले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....