विठ्ठला अर्बन को.ऑ.बँक मंठा शाखेचे उत्साहात उद्घाटन ठेवीदार व खातेदारांचा विश्वास संपादन करणार---डॉ. राजेश वायाळ
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
दि.२९ मंठा येथे विठ्ठला अर्बन बँक शाखेचे उत्साहात उद्घाटन शुक्रवार दि.२९रोजी श्री. पोळ बाबा यांच्या हस्ते करण्यात आले.
विठ्ठला अर्बन बँक मार्फत ठेवीदार व खातेदारांना सुविधा देणार असून ग्राहकांचा विश्वास संपादन करणार तसेच बेरोजगार तरुण, शेतकरी, कर्मचारी यांना बँके मार्फत आर्थिक सक्षम बनविणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वायाळ यांनी केले. यावेळी शेतकरी,व्यापारी, डॉक्टर, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी यांची उपस्थिती होती. विठ्ठला अर्बन बँकच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत मदनराव वायाळ तसेच बँकेचे मॅनेजर किरण देशमुख यांनी केले.