प्रियदर्शनी इंग्लिश स्कूलमध्ये अवतरली. पंढरी

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दि.9 जुलै 2022 रोजी परतुर तालुक्यातील आष्टी येथील प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी ,ते सहावी पर्यंतच्या मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये सहभाग घेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला .
विठ्ठल रुक्मिणी चे लोभस व गोड रुप, इवल्याशा हातात टाळ घेऊन हरिनामाचा जप करत छोटे वारकरी सजुन धजुन आले होते. कुणी डोक्यावर तुळस घेतली होती तर कुणी हातात भगवा झेंडा घेतलेला…
आषाढी एकादशीनिमित्त आयोजित वारी या उपक्रमाचे. दिलेल्या सुचने प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा अतिशय सुंदर अशी केली होती. ढोल, ताशांच्या गजरात शाळेतून वारी निघाली. टाळ वाजवत, हरिनामाचा जप करत वारी निघाली.
विठ्ठल रुक्मिणी ची वेशभूषेतील विद्यार्थी पुढे तर चोपदार सोबत, मागे बाल गोपाळांची वारी. अतिशय रम्य असे दृश्य, चिमुकल्यांची वारी पाहुन शहरातील नागरिकांनी कौतुकाने वारीचे स्वागत केले. सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले.
.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.रामप्रसाद थोरात सर व
प्रियदर्शनी इंग्लिश स्कूलमध्ये अवतरली. पंढरी
 ====================
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दि.9 जुलै 2022 रोजी परतुर तालुक्यातील आष्टी येथील प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी ,ते सहावी पर्यंतच्या मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये सहभाग घेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला .
विठ्ठल रुक्मिणी चे लोभस व गोड रुप, इवल्याशा हातात टाळ घेऊन हरिनामाचा जप करत छोटे वारकरी सजुन धजुन आले होते. कुणी डोक्यावर तुळस घेतली होती तर कुणी हातात भगवा झेंडा घेतलेला…
आषाढी एकादशीनिमित्त आयोजित वारी या उपक्रमाचे. दिलेल्या सुचने प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा अतिशय सुंदर अशी केली होती. ढोल, ताशांच्या गजरात शाळेतून वारी निघाली. टाळ वाजवत, हरिनामाचा जप करत वारी निघाली.
विठ्ठल रुक्मिणी ची वेशभूषेतील विद्यार्थी पुढे तर चोपदार सोबत, मागे बाल गोपाळांची वारी. अतिशय रम्य असे दृश्य, चिमुकल्यांची वारी पाहुन शहरातील नागरिकांनी कौतुकाने वारीचे स्वागत केले. सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले.
.यावेळी अध्यक्ष श्री. रामप्रसाद थोरात सर , प्रिन्सिपल अर्चना लोढा आणि शिक्षक शिवकन्या थळपती , विमल माटे, सीमा मुळे, पंकजा तोगे ,गौरी थोरात, मनीषा स्वामी, गायत्री भागवत ,छाया राऊत ,कावेरी गाडे, सोनाली पोटे , अशोक मोगरे ,फुम सर आणि ऑकमाय टीचर(नागालँड)
सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले .
 .

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....