मुस्लिम, दलित, आदिवासी समाज बांधवांना परिवार नव्हे तर कर्तुत्व पाहून देशाच्या सर्वोच्च पदावर बसवणे हे केवळ भाजपातच शक्य - , मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या पायगुणामुळेच ओबीसी आरक्षण मिळाले - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,मराठा आरक्षणासाठी सदैव प्रयत्नशील लवकरच त्याबाबतही निर्णय होईल अशी अपेक्षा - लोणीकर
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या अधिकृत उमेदवार व नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची आज प्रचंड मताधिक्याने राष्ट्रपतीपदी निवड झाली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली त्यानिमित्त आज मंठा येथे आदिवासी समाज बांधवांसोबत जल्लोष करत फटाक्यांच्या आतिषबाजीत लोणीकर यांनी श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले व सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही वाटचालीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदा परिवार वादाचा विचार न करता सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती या अत्यंत महत्त्वाच्या पदांसह पद्म, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी निवड करण्यात येत आहे ही खऱ्या अर्थाने भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून एखाद्या विशिष्ट परिवारात जन्माला आलो यापेक्षा कर्तुत्व पाहून संधी दिली जाते ही बाब अत्यंत महत्त्वाची असून *स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात शास्त्रज्ञ असणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदाची संधी भाजपच्या वतीने देण्यात आली, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या कार्यकाळात रामनाथजी कोविंद यांना संधी मिळाली, तर आदिवासी समाजातील श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना आज देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून संधी मिळाली हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच घडू शकते* असेही यावेळी अभिनंदनपर बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या होत्या परिणामी माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मान्य केले असून येत्या पंधरा दिवसात ओबीसींच्या आरक्षणासह निवडणुका घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत ही बाब अत्यंत प्रेरणादायी आणि ओबीसी समाजासाठी महत्त्वाची असून मनात असेल तर प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते असेच यामधून दिसून येते असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज मंठा येथे केले.
मंठा येथे नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल व ओबीसी समाजाच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यासाठी व राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यासाठी आयोजित रॅली च्या समारोपप्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर भाजप प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर गणेशराव खवणे ज्ञानेश्वर शेजुळ रमेश भापकर सतीश निर्वळ संदीप भैय्या गोरे सुभाष राठोड दिलीप पवार बिडी पवार दत्ता कांगणे कैलास बोराडे राजेश मोरे नागेश घारे, रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात बाबुराव शहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याचा प्रश्न दिर्घकाळ प्रलंबित होता. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने प्रयत्न केले होते त्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली. श्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलयांनी तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून आमच्या हाती सत्ता द्या तीन महिन्यात आरक्षण मिळवून देतो अन्यथा राजकारण सोडेन असा शब्द ओबीसी समाज बांधवांना दिला होता तो शब्द पूर्ण करत शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून अवघ्या वीस दिवसात माननीय सुप्रीम कोर्टात हे आरक्षण मिळाले ही बाब अत्यंत अभिनंदननीय असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले. ओबीसी समाजाला मिळालेल्या राजकीय आरक्षणामुळे ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजकीय पदापासून दूर गेलेला ओबीसी समाज बांधवाला देखील सत्य मध्ये सन्मानाचा वाटा मिळणार आहे असेही लोणीकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले
भारतीय जनता पार्टी हा एकमेव सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असून सबका साथ सबका विकास सबका प्रयास या भावनेतून प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीने ओबीसी बांधवांना दिलेला शब्द पाळला असून यापुढे देखील भारतीय जनता पार्टी ओबीसी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी होती आहे आणि राहील असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले
*मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील*
ज्याप्रमाणे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण शक्य तितक्या लवकर मिळवून देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केला आहे अगदी त्याच धर्तीवर शक्य तितक्या लवकर मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं व माननीय उच्च न्यायालयात टिकलेलं मराठा आरक्षण देखील मागील काळात महाविकास आघाडी सरकारने घालवले होते ते आरक्षण देखील पुन्हा नव्याने मिळवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून त्या पाठपुराव्याला नक्की यश मिळेल व लवकरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाप्रमाणेच मराठा आरक्षण देखील मिळेल असेही याप्रसंगी लोणीकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी अशोक वायाळ गणेशराव शहाणे बाबाराव थोरात विठ्ठलराव काळे उद्धवराव घोंडगे कैलास बोराडे अविनाश राठोड, शत्रुघ्न कणसे, गजानन उफाड मुस्तफा पठाण गणेश चव्हाळ विलास घोडके पंजाबराव बोराडे सुधाकर सातोनकर संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण, रमेश राठोड रावसाहेब आढे दिलीप पवार अजय चव्हाण विक्रम उफाड दत्ता कांगणे प्रसाद गडदे राजेभाऊ खराबे अरुण खराबे अशोक राठोड अनिल चव्हाण भगवान लहाने अंसाबाई राठोड रावसाहेब वैद्य अनंता वैद्य श्रीराम राठोड मालदार लहू आढे भगवान कुरधने किशोर हनवते शिवाजी पाईकराव, तानाजी शेंडगे कैलास चव्हाण माऊली गोंडगे निवास देशमुख नितीन सरकटे शरद पाटील भगवान देशमुख बाबाजी जाधव रामकिसन अवचार दिगंबर आवचार केशव येऊल प्रेमगोपाल कासट पंकज राठोड शिवाजीराव थोरवे रामकिसन बोडके भगवान सरकटे आबासाहेब सरकटे गोपीचंद पवार सोपान वायाळ रमेश राठोड महेश पवार राजेभाऊ डेंगळे सोपानराव खरात पवन केंदळे मनोज देशमुख परमेश्वर शिंदे राजभाऊ खराबे भास्कर कुलवन्त, गोविंद खरात, सचिन राठोड शंकर फड नारायण राठोड शरद मोरे बाळासाहेब तौर संतोष बोराडे भागवत देशमुख सतीश लोमटे बाळू काळे प्रकाश गबाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते