जयपूर येथे जय भवानी माध्यमिक विद्यालयात वृक्षरोपण
परतूर –प्रतिंनिधी हनुमंत दवंडे
मंठा तालुक्यातील जयपूर येथे जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया चया मैदानात 12 वी विज्ञान विद्यार्थी व विद्यार्थिनीने वतीने मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक सिद्धार्थ पवार, शिक्षक एस.आर.पाटील, एस डी काकडे, सचिन मस्के, गजानन तुरेराव, सुगण नितनवरे, जगन काळे, एकनाथ वायाळ, रामेश्वर उबाळे, गजानन काकडे, उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थी यांनी वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग घेतला, विद्यालयाच्या परिसरात लावलेल्या झाडाची संगोपन करून संवर्धन करण्याची जबाबदारी उच्च महाविद्यालय घेणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सिद्धार्थ पवार, यांनी दिली आहे.