कपिल आकात यांनी घेतली अनाथ मुलींची शैक्षणिक जबाबदारी...
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालय या शहरातील नामांकित शाळेत दिनांक 27 जुलै रोजी परतूरच्या इतिहासात नोंद घ्यावी असा प्रसंग पाहिला मिळाला. शाळेतील एका अनाथ गरीब मुलीचा वाढदिवस संस्थाचालक कपिल आकात यांनी स्वतः साजरा करून त्या मुलीची पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
परतुर येथील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयाची इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी जागृती पिसाळ या मुलीचे आई-वडील तीन महिन्यांचे असतानाच वारले परतूर शहरातील देवकर गल्लीत राहणारे तिचे मामा गणेश घोडके यांनी तिला परिस्थिती गरीब असताना शिक्षण सुरू ठेवले. शाळेत मुलींचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा असल्याने दिनांक 27 जुलैला या मुलीचा वाढदिवस साजरा केला जात असताना योगायोगाने शाळेत संस्थेचे सचिव कपिल आकार तिथे आले होते त्यांना याची माहिती दिली असता त्यांनी अनाथ मुलीचा वाढदिवस स्वतः साजरा करून सर्वांना चिकित केले इतकेच नाही तर तिला आतापर्यंत शिक्षण देणारे तिच्या मामाची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे शिक्षक योगेश बरी दे यांनी सांगितले असता कपिलाकडे या मुलीची पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली..