ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये अवतरले पंढरपूर..
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दि.9 जुलै 2022 रोजी परतुर येथील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी ,ते पाचवी पर्यंतच्या मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये सहभाग घेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला .
विठ्ठल रुक्मिणी चे लोभस व गोड रुप, इवल्याशा हातात टाळ घेऊन हरिनामाचा जप करत छोटे वारकरी सजुन धजुन आले होते. कुणी डोक्यावर तुळस घेतली होती तर कुणी हातात भगवा झेंडा घेतलेला…
आषाढी एकादशीनिमित्त आयोजित वारी या उपक्रमाचे. दिलेल्या सुचने प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा अतिशय सुंदर अशी केली होती. ढोल, ताशांच्या गजरात शाळेतून वारी निघाली. टाळ वाजवत, हरिनामाचा जप करत वारी निघाली.
विठ्ठल रुक्मिणी ची वेशभूषेतील विद्यार्थी पुढे तर चोपदार सोबत, मागे बाल गोपाळांची वारी. अतिशय रम्य असे दृश्य, चिमुकल्यांची वारी पाहुन शहरातील नागरिकांनी कौतुकाने वारीचे स्वागत केले. सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले.
.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. खणके सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृद्धांनी अथक परिश्रम घेतले .