वलखेड येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप समाजिक उपक्रमाने युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस साजरा
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर येथील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवामोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून भारतीय जनता युवा मोर्चाकडुन जि.प.प्रा.शाळा वलखेड येथील १४० विद्यार्थ्यांना युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावेळी आसाराम सुरुंग, विश्वनाथ सुरुंग, कुंडलिक डव्हारे, बबन येडेकर, लक्ष्मण बिल्हारे, विजय गिरी, तुळशीदास बिल्हारे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष खवल, श्रीकांत मायकलवाड, कैलास पाईकराव, प्रेमनाथ झरेकर यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे कार्यकर्त्ये उपस्थित होते.
*फोटो ओळी.. परतूर येथे युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस वलखेड येथे शालेय विद्यार्थ्यांना वही पेन शैक्षणिक साहित्य वाटप करतांना आदि,*