मधुकर निलेवाड यांचा समर्थकासह मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठिंबा
परतूर/( प्रतिनिधी) हनुमंत दवंडे
परतुर शहरातील प्रभाग क्र. दोन मधील इच्छुक उमेदवार मधुकर श्रीरंग निलेवाड यांनी त्यांच्या सहकार्यासह आज परतूर येथे अग्रवाल साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जाहीर समर्थन दिले आहे.
त्यांच्या समवेत पाराजी तुकाराम निलेवाड, विलास पांडुरंग निलेवाड ,श्रीरंग बाजीराव निलेवाड ,सुधाकर विठ्ठल निलेवाड ,मयुरी निलेवाड, परसराम माने संदीप जईद, अरुण बागवान, गणेश निलेवाड, आदींनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली परतूर शहरांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण तन-मन-धनाने काम करणारा असून व शहराच्या विकास कामात मोहन अग्रवाल यांना नेहमी सहकार्य राहील असेही समर्थन देणाऱ्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. मधुकर निलेवाड हे प्रभाग क्र. दोनचे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून इच्छुक उमेदवार आहेत.