परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप
परतूर प्रतीनीधी हनुमंत दवंडे
परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप दि 24 रोजी संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते तर गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
परतूर येथील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पालकांची उपस्थिती पण लक्षणीय होती. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी सांगितले की,विद्यार्थी यांचा शैक्षणिक विकास व्हावा या साठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. असे ते म्हणाले यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मानवविकास चे तालुका समन्वयक श्री काठमोरे, श्रीमती स्मिता रोडगे,विजय राखे, अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,श्याम कबाडी, रामराव घुगे,सचिन कांगने,कैलास खंदारे,अनिल काळे,बळीराम नवल,रमेश निर्वळ, सुभाष बरकुले, राजू वडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.