भारताच्या स्वातंत्र्य ही संघर्ष, धैर्य आणि शौर्याची गाथा, भारताचा स्वातंत्र्य लढा सर्वांसाठी प्रेरणादायी - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला जातो आहे.भारत आणि इतर सर्व देशांमधील स्वातंत्र्य लढ्यात मोठा फरक होता. त्यामुळे भारत राहण्यासाठी एक अद्वितीय स्थान बनला. आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्तवात अहिंसेच्या
मार्गाने सर भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस वीर सावरकर यांच्यासारख्या जहाल मतवादी राष्ट्रपुरुषांच्या नेतृत्वात लढत स्वातंत्र्य मिळवले. भारताच्या स्वातंत्र्याची गाथा ही संघर्ष, धैर्य आणि शौर्याची गाथा आहे. त्यामुळे आपला स्वातंत्र्य लढा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले
७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वरफळ ता.परतुर जि.जालना येथे आज राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी शिक्षक विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. याप्रसंगी "हर घर तिरंगा" अभियानाची माहिती दिली, राष्ट्राभिमान जागृतीसाठी आज प्रत्येक घरावर तिरंगा दिसत असल्याचा अभिमान वाटला असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले प्रसंगी मंचावर माजी सैनिक विजय जी गिरी, ओम शेठ मोर, सरपंच नदीम शेख, भगवान आरडे, रामदास घोंगडे, रामकिसन रुपनर, सुधाकर बेरगुडे, शेख खालिद भाई, हयात खा पठाण, शकूर पटेल, सुहास कुलकर्णी, युसुफ शेख मुख्याध्यापक रामेश्वर सोळुंके चेअरमन सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती
आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या प्रवासाकडे वळून पाहतो तेव्हा आपले हृदय अभिमानाने आणि सन्मानाने भरून येते. एकता आणि सद्भावनेचा विचार सोबत घेऊन एकत्र राहून आपण एवढी मोठी लोकसंख्या असूनही भारत चैतन्यशील आणि एकसंध देश आहे. त्यामुळे संपूर्ण विश्व आज भारताकडे आदराने बघत आहे. भारतातील लोकांनी वेळोवेळी आपल्यातील एकता आणि सद्भावना दाखवून देशाला महान बनवले आहे. गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि संकटातून देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील लोकांनी धर्म, जात बाजूल ठेवून आपापल्या परीने देशाची सेवा केली आणि आज आपण या मोठ्या संकटावर मात केली आहे. त्यामुळेच आज भारत एका सुरक्षित ठिकाणी उभा आहे. असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात राज्यातील घरोघरी तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत देशाचा एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्र असा उल्लेख आहे. आपल्या देशातील मुलांना देशाच्या महानतेची ओळख पटवून देणे आपली जबाबदारी आहे. भारताने स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला आणि आपला सन्मान कसा मिळवला हे त्यांच्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्यांनी जीवाचे बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या शूरांना आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्वप्नातील देश उभारणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असेही लोणीकर यावेळी म्हणाले
*विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची मान उंचवावी - लोणीकरांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद*
स्वामी विवेकानंद यांनी यशप्राप्ती शिवाय थांबू नका असा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला या महापुरुषांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षण प्राप्त करून कुटुंब गाव तालुका जिल्हा राज्य यासह संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंच व्हावी यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे श्री लोणीकर यांनी वरफळ येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची संवाद साधताना म्हटले यावेळी शिक्षक पालक यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
यावेळी माली पाटील खरात साहेबराव घोंगडे आश्रोबा गोरे उद्धव गोरे दत्ता डोईजड विठ्ठल डोईजड शेषराव गोरे दिलीपराव पठाडे मारुती जाधव रामा जाधव संजय शर्मा अशोक कोरडे प्रा सहदेव मोरे पाटील प्रा ओमप्रकाश बोरकर जाकीर पटेल बालासाहेब थोरात अमोल मोरे कैलास शिंदे अशोक अवसरमोल गोरख आढे शिवगंगा लिंगनवाड यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षकवृंद विद्यार्थी राष्ट्रभिमानी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते