वडीगोद्री व दहिफळ खंदारे येथील प्रसूतीच्या घटने संदर्भात युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर आक्रमक,जिल्हा प्रशासनाचा आरोग्य यंत्रणेवर अंकुश नाही-युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर
जालना/प्रतिनिधी समाधान खरात
जालना जिल्हयातील वडीगोद्री व दहिफळ खंदारे येथील प्राथमिक अरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्हा प्रशासनाची व अरोग्य विभागाची लक्तरे वेशीला टांगली आहे.जिल्ह्याला माजी अरोग्यमंत्री लाभले असतांना देखील अरोग्य सुविधा जैसे थे आहे.ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या अरोग्य सुविधा मिळावे.यासाठी जिल्हा परिषदेत करोडो रूपयांचे नियोजन केले जाते.अनेक प्राथमिक अरोग्य केंद्रात तर वैदकीय अधिकारीच उपलब्ध नाहीत.जिल्हयात प्राथमिक अरोग्य केंद्राच्या आवारात प्रसुती झाल्याने ही बाब निदंनिय असुन अशा हलगर्जी डॉक्टरांवर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी अशी भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केली आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात असे म्हटले आहे की,अंबड तालुक्यातील वडीगोद्री व मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे आरोग्य उपकेंद्रावर रात्रीच्यावेळी प्रसूतीसाठी उपकेंद्रावर आलेल्या महिलांची वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर असल्यामुळे उपकेंद्राच्या आवारातच प्रसुती झाली ही घटना अतिशय निंदनीय असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बाबतीत गंभीर पावले उचलत दोषीवर तात्काळ कार्यवाही करावी.जिल्हाभरातील आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हेडक्वार्टरला कधीच थांबत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र ही शोभेची वस्तू बनले असून नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, खाजगी रुग्णालयात जाऊन आपले खिसे रिकामे करावे लागत आहेत , खरे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असतो मात्र ही बाब गंभीरतेने न घेता प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी,जिल्हा अरोग्य अधिकारी हे आपल्या मर्जीप्रमाणे वागत असल्यामुळे यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे चित्र या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी म्हटले असून जे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हेडक्वार्टरला थांबत नसतील अशा वैदकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून यासंदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे.या घटनेला दोन दिवस उलटले तरीही अरोग्य विभागाकडुन कुठलेही कारवाई झाली नसल्याने लोणीकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.