विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला उपस्थित राहावे-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना
जालना प्रतीनीधी समाधान खरात
जालना जिल्ह्यातील विविध प्रकारच्या हजारोच्या संख्येने दिव्यांग असून दिव्यांगसाठी ठोस असे कोणतेही धोरण शासनाने राबविलेले नाही व दिव्यांगाचे कायदे जीआर हे कागदपत्रे राहिलेले आहेत
तसेच सन 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा सन 2001 चे महाराष्ट्राचे दिव्यांग धोरण व सन 2016 चा अपंग हक्क संरक्षण कायदा याची देखील अमलबजावणी होत नाही याकरिता दिव्यांगाच्या संपूर्ण कल्याण व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने महिला बालकल्याण व मागासवर्गीय मंत्रालय प्रमाणे दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय व विभाग तयार करावा यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच प्रहार अपंग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा बापूराव काणे , राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत , मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग बांधवांनी उपोषणा करीता उपस्थित राहावे व असे आव्हान अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना , विठ्ठल चव्हाण, शंकर शिरगुळे माजी जि. अध्यक्ष हनुमान माने ,बाळासाहेब , रवींद्र अंभोरे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आडे माऊली कदम आबाजी भुंबर शेख फिरोज यांनी केले आहे