कमी पावसामुळे पिकांचे नुकसान, जायकवाडी धरणाचे चे पाणी डाव्या कालव्यात सोडा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी,डाव्या कालव्यात पाणी सुटल्यास परतूर, घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ - लोणीकर यांची माहिती,अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे पत्राद्वारे लोणीकर यांनी केली मागणी

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
परतुर अंबड व घनसावंगी या तालुक्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकांचे पाण्यावाचून अतोनात नुकसान होत असून पीके करपुन जात आहेत. त्यामुळे जायकवाडी च्या डाव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अधीक्षक अभियंता  लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे केली आहे.

त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड व घनसावंगी या तालुक्यातील शेतीचा विचार करता जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडणे आवश्यक आहे. पाणी सुटल्यास परतूर घनसावंगी व अंबड या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली

परतुर घनसावंगी व अंबड या भागामध्ये अत्यल्प वृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तत्सम पिके सुकू लागलेली आहेत या बाबीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून घरातील दागदागिने विकून, बँकातील कर्ज काढून यावर्षी पेरणी केली आहे असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे 

या हंगामाच्या सुरुवातीला सर्वत्र पाऊस होत होता मात्र या भागांमध्ये पावसाच्या तुरळीक सरी कोसळल्यामुळे जोमातील पिके कोमोजू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पिके जतन करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास निश्चितपणाने या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील धन जोपासण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात यावे करिता माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे..!!

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....