स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात तुलसी महिला प्रभागसंघाची 'वृक्ष दिंडी'(स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षदिंडी सह महिला बचत गटांना तीन लक्ष रुपयाचे कर्ज वितरित)


मंठा :-  प्रतिनिधी सुभाष वायाळ 
दि.१३ स्वातंत्र्याचा '75' अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तुलसी महिला प्रभागसंघ केंधळी च्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे औचित्य साधून वाजोळा पू येथे (ता १२) 'वृक्ष दिंडी हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करून सर्व गाव भर प्रभात फेरी काढून 'तक्षशिला' विहराच्या मैदानावर  बचत गटाच्या महिलांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी पंचायत समितीचे  सहाय्य गटविकास अधिकारी पी एस तायडे,कृषी अधिकारी जाधव, विस्तार अधिकारी वी पी पाटील , ग्रामसेविका एम एम वडगावकर मॅडम, उमेद चे रवींद्र वाघमारे, श्याम खोंड , प्रभाग समनव्यक अनिल मोरे , समाधान आघाम, तुलसी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा पूजा वाघमारे, बाळासाहेब वाजोळकर, ग्रा.प सदस्य जयभीम रंधे, ज्ञानदेव गवळी,बाळासाहेब तौर, केंधळी प्रभागातील सर्व कॅडर उपस्थित होते.
 महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने प्रशिक्षण आयोजित करून त्यांना प्रशिक्षित करून उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले तसेच तुलसी महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत महिलाना उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते उपजीविका वाढविण्यासाठी तीन लक्ष रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.प्रभागसंघ व्यवस्थापिका सुषमा ढाकरगे यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा दिला तर ग्रामसंघ लिपिक वैशाली शहाणे यांनी प्रभागाच्या वतीने ९० गटांना उपजीविका कर्ज वितरित केलेले सांगितले 
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा बोराडे यांनी मानले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....