दिव्यांगांना रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना द्यावा.- अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 दिनांक 4 /8 /2022 रोजी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी साहेब जालना यांना जिल्ह्यातील दिव्यांगांना रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना देण्यात यावा या करिता निवेदन देण्यात आले आहे.
       या निवेदनामध्ये जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त रास्तभाव दुकाने व केरोसीन याचे परवाने दिलेले आहेत तसेच जे रद्द परवाने झालेले आहेत व जे परवानाधारक मयत झालेले आहेत व नवीन रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना दिव्यांग बांधवांना देण्यात यावा याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांग बांधवांना जे शासकीय सेवेमध्ये नाहीत उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा बेरोजगार दिव्यांगाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी जिल्ह्यामध्ये जे परवाने रद्द झालेले आहेत किंवा एकापेक्षा जास्त परवाने दिलेले आहेत व जे परवानाधारक मयत झाले आहेत. तसेच दिव्यांग बांधवांना नोकरीही नाही आणि रोजगारही नाही अशा दिव्यांग बांधवांना तसेच नवीन रास्तभाव दुकाने व केरोसीनचे परवाने दिव्यांग बांधवांना देण्यात यावे जेणेकरून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध रोजगार उपलब्ध होईल याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा. अशी विनंती निवेदनामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी केली आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....