दिव्यांगांनाही मोफत बस सेवा प्रवास द्यावा- अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
       जालना सध्या महाराष्ट्र शासनाने देशाच्या 75 वा अमृत महोत्सव निमित्त ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत बस सेवा प्रवास दिली आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन पण राज्यामध्ये दिव्यांग हा असा पीडित समूह घटक आहे आहे की दिव्यांगांना महाराष्ट्र शासनाची मदतीची आवश्यकता आहे
      तरी महाराष्ट्र शासनाने 50% च्या वरील दिव्यांगांना मोफत बस सेवा प्रवास द्यावा दिव्यांगांना बस सेवा प्रवास मध्ये 75 टक्के सवलत दिली आहे पण जे दिव्यांग बांधव 50 टक्के च्या वर आहेत अशा दिव्यांगांना महाराष्ट्र शासनाने मदत म्हणून मोफत बस सेवा प्रवास द्यावा असे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी पत्रकाराशी बोलताना भावना व्यक्त केली

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात