ब्राईट स्टार मध्ये 'इको फ्रेंडली गणपती' उत्सव
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आज ब्राईट स्टार इंग्लिश परतूर मध्ये इको फ्रेंडली गणपती उपक्रम राबविण्यात आला . यामध्ये सर्व विद्यार्थांनी विविध मातीपासून आकर्षक अशा श्री गणेश मूर्ती बनवल्या . कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थांचे क्रमांक काढण्यात आले
यामध्ये नर्सरी ते सिनियर ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक पवार राधिका तर द्वितीय क्रमांक लहाने सम्यक यांनी पटकावला तर इ 1 ली ते 10 वी च्या ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक - मींड अंबिका द्वितीय - बन्सीले अक्षरा तृतीय - भापकर ज्ञानेश्वरी चौथा क्रमांक - तनपुरे भक्ती तर उत्तेजनार्थ बक्षिस बागडीया तनिशा या विद्यार्थांनी पटकावले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माहेश्वरी महिला मंडळाचे सचिव - कल्पना लोया, कोषाध्यक्ष - सीमा भुतडा उपाध्यक्ष - शिल्पा मालपाणी मा. पालक - पूजा बागडीया व संगीता अग्रवाल उपस्थित होते . प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थाना खूपच प्रेरक व मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुकडे सर यांनी केले . याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री खणके सर , सर्व मा. शिक्षकवृंद व विदयार्थी उपस्थित होते.