गेले ते कावळे, सच्चा मावळा सेनेचाच- दत्ता पाटील सुरुंग

परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे

परतूर शहर आणि तालुक्यात शिवसेनेला खिंडार अशा आशयाच्या बातम्या येत असून विविध पक्षात फिरून आणखी एखाद्या पक्षात जाणार्‍याच्या इतर पक्षातील प्रवेशामुळे शिवसेनेला खिंडार पडणे हे हास्यास्पद असून सच्चा मावळा आजही शिवसेनेत असून उद्या तो कायम राहिल असा विश्वास शिवसेनेचे परतूर शहरप्रमुख दत्ता पाटील सुरुंग यांनी व्यक्त केला.
राज्यात शिवसेना फुटीबाबत नेहमीच चर्चा होते याच पद्धतीने परतूर शहरात शिवसेनेला खिंडार अशी बातमी वृत्तपत्र व समाज माध्यमातून सध्या फिरतांना पहायला मिळते. जे इतर पक्षातून शिवसेनेत आले त्यांच्या जाण्याने शिवसेनेला खिंडार पडणे अत्यंत हास्यास्पद असल्याचे दत्ता पाटील सुरुंग म्हणाले. शिवसेना हा अभेद्य असा किल्ला असून काही कावळे सत्तेसाठी उडाले असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे सर्व मावळे शिवसेनेत आहोत ना मग खिंडार कसे पडेल असा सवालही सुरुंग यांनी करून झालेल्या घटनेचा खरपूस समाचार घेतला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....