परतुर येथील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाच्या कामाची आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून पाहणी,परतुर तालुक्यातील मुली आय. एस आय पि एस अश्या उच्य पदावर विद्यार्थी गेल्या पाहिजे - आ.लोणीकर,दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याच्या कार्यकारी अभियंता सूचना
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आंबा तालुका परतुर येथे बांधकाम करण्यात येत असलेल्या 15 कोटी रुपये किमतीच्या मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहा च्या बांधकामाची पाहणी केली परतूर तालुक्यातील मागासवर्गीय मुलीं मुलींना चांगले शिक्षण मिळावे मुली चांगल्या शिकाव्यात मोठे होऊन डॉक्टर इंजिनियर वकील या पदावर जाव्या याकरिता परतूर येथे सुसज्ज भव्य दिव्य असे वस्तीग्रह बांधण्यात आले, आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा वस्तीगृहाचा प्रश्न आमदार लोणीकर यांनी कायमचा मिटविला
यावेळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता व संबंधित कंत्राटदारांना दीपावली पूर्वी हे काम पूर्ण करून लोकार्पण करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या
तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये परतूर तालुक्यातील आंबा येथे व मंठा येथे अनुक्रमे 15 कोटी रुपये किमतीच्या मागासवर्गीय मुलींच्या वस्तीग्रह कामाला मंजुरी मिळाली होती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा भार सांभाळताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील विकास कामाकडे विशेष लक्ष देऊन दलित पीडितांच्या मुलांना शहराच्या ठिकाणी येऊन शिक्षण घेता यावे यासाठी मंठा व परतुर येथे मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाची मंजुरी मिळवली होती त्या वस्तीग्रहांचे काम आता अंतिम टप्प्यात असून हे काम दीपावली पूर्वी पूर्ण करून लोकार्पण करत विद्यार्थिनींसाठी खुले करा अशा प्रकारच्या सूचना संबंधित बांधकामाचे कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता यांना दिल्या
तात्कालीन फडणवीस सरकारच्या काळामध्ये परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी 4700 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंजूर करून घेतला होता त्यामधून परतुर मंठा तालुक्यामध्ये रस्ते सिमेंट रस्ते नाल्या बांधकाम विविध ठिकाणी सभामंडपे नाट्यगृह न्यायालयीन इमारती स्मशान भूमी विकास आदी कामे करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाचेही काम हाती घेण्यात आले होते ते काम आता पूर्णत्वास जात असून दीपावली पूर्वी निश्चितपणाने या वस्तीगृहाचा लोकार्पण सोहळा होईल या पद्धतीने काम करण्याच्या सूचना लोणीकर यांनी संबंधितांना दिल्या.यावेळी सरपंच मेराज खतीब माजी पंचायत समिती सदस्य रामजी कोरडे मा,पंचायत समिती सदस्य कृष्णा भदर्गे , प्रशांत बोनगे, कैलेस बोनगे, गंगाधर बापू पवार पद्माकर कवडे ,सार्वजनिक बांधकाम उपा अभियंता पाटील हे उपस्थित होते..!!