राशन कार्ड साठी सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने तहसीलदार यांना निवेदन सादर...
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर येथील तहसील कार्यालयामध्ये अनेक सर्वसामान्य लोक राशन कार्ड साठी येत असतात अनेक वर्षापासून फाईल प्रलंबित आहेत राशन कार्ड साठी ये जा करून सर्वसामान्य लोकांचा जीव मेटकुटीलाआलेला आहे.
नायब तहसीलदार पुरवठा विभाग यांच्याकडे याचे काम आहे यांच्याकडे अनेक लोक राशन कार्ड च्या तक्रारी घेऊन येतात त्या तक्रारीचे योग्य दिशेने निराकरण होत नाही त्यासंदर्भात विचारणा केली असता हे सांगतात की आमच्याकडे याचा अतिरिक्त पदभार दिलेला नाही अशी उडवा उडवी चे उत्तर नायब तहसीलदार नेहमी लोकांना देत असतात. एजंटच्या माध्यमातून राशन कार्ड देण्याचे काम तहसील विभागांमध्ये सुरू आहे हे एजंट कोण आहेत. यांच्याकडे कोणता पदभार आहे .या सर्व प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे बेजबाबदार नायब तहसीलदार यांना कार्यमुक्त करण्याची मागणी सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांनी केली आहे