उपविभागीय कृषी अधिकारी सोनकांबळे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून,जिल्हा कृषी अधिकारी यांची सुद्धा चौकशी करा प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना
प्रतिनिधी परतुर हनुमंत दवंडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली निवेदनात पुढे म्हटले आहे की,उपविभागीय कृषी अधिकारी परतुर गजानन सोनकांबळे यांनी १ लाख रुपये घेत असतांनी अँटी करप्शन ब्युरो जालना सापळा रचून कारवाई करूनअटक करण्यात आली,
उपविभागीय कृषी अधिकारी परतुर सोनकांबळे यांची पहिली पोस्टींग परतूर येथे झाली होती त्यांची सेवा पूर्ण ३ वर्षे झालेली नाहीत, म्हणून सोनकांबळे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, कारण सोनकांबळे यांच्या कालावधीत पोखरा योजने अंतर्गत कामे झाली ती सर्व कामे संबंधित बोगस आहेत, पोखरा या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जो लाभ मिळतो तो संबंधित डीलर यांनी श्री सोनकांबळे यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयाची लुटमार करून बिल मंजूर करून घेतले, त्याची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना साहित्य पुरवणाऱ्या डीलर कडून रिफंड पैसे वसूल करण्यात यावेत, तसेच गजानन सोनकांबळे उपविभागीय कृषी अधिकारी परतुर संपत्तीची चौकशी व त्यांच्या नातेवाईकाची चौकशी संपत्ती जप्त करण्यात यावी, सोनकांबळे यांच्या कालावधीमध्ये झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून मोठ मोठ्या कंपन्याचे डीलर यांनी उपविभागीय कृषी अधिकारी सोनकांबळे या अधिकाऱ्याला मॅनेज करून कोट्यावधी रुपयाचे बिल उचलून घेतले त्याची चौकशी करून त्या संबंधित डीलर झालेले बोगस कामे केली याची शासनाने वसुली करावे, सोनकांबळे उपविभागीय कृषी अधिकारी परतुर यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट मार्गाने वसुली करुन तो भ्रष्ट पैसा जिल्हा कृषी अधिकारी यांच्या पर्यंत पोहोचला का याची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे, जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे नवीन येणाऱ्या उपविभागीय कृषी अधिकारी परतुर यांनी संबंधित शेतकऱ्यांचे पारदर्शक कामे करून सहकार्य करावे भ्रष्ट उपविभागीय कृषी अधिकारी परतुर गजानन सोनकांबळे व जिल्हा कृषी अधिकारी जालना यांचे कनेक्शन आहे,म्हणून सोनकांबळे यांच्या कालावधीत झालेल्या कामांची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना विविध शेती साहित्य पुरवठा करणाऱ्या सर्व डीलरची चौकशी करून दिलेल्या बोगस बिलाची वसुली करून सोनकांबळे यांना कायमस्वरूपी बडतर्फ करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे...