मुख्याध्यापक जगदीश कुडे यांचे दातृत्व सहा मुलांचे स्वीकारले पालकत्व..शिक्षकाजवळ संवेदनशीलता अन दातृत्व असावेच - डाॅ.सुहास सदाव्रते
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
वर्गाच्या चौकटीबाहेर जावून विद्यार्थ्याच्या मनाचा विचार करणारा संवेदनशील आणि दातृत्व शिक्षक असेल तर जग जिंकता येते. मुख्याध्यापक जगदीश कुडे यांचे दातृत्वाचे कृतीशील विचाराची प्रेरणा घेता आली पाहिजे, असे आवाहन साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष तथा कवी- पत्रकार डाॅ.सुहास सदाव्रते यांनी मंगळवारी ( ता.२३ ) केले.
श्रीरामतांडा ( ता.मंठा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगदीश कुडे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या ६ विद्यार्थ्याना गणवेश,शैक्षणिक साहित्य, दप्तर देण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिली जाणारी शरद पवार फेलोशिप जगदीश कुडे यांना मिळाली आहे. सदर फेलोशिपची प्रेरणा घेत श्री.कुडे यांनी ४ अनाथ आणि २ स्थलांतरित पालकाचे मुले यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांच्या शुभहस्ते पालकत्व स्वीकारलेल्या विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.पुढे बोलतांना डाॅ.सदाव्रते म्हणाले,की शिक्षकाने आपल्या विचारांची चौकट बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या सर्वागिण विकासाचा ध्यास जो बाळगतो,तोच शिक्षक दिशा देवू शकतो असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक जगदीश कुडे यांनी शैक्षणिक पालकत्व का स्वीकारले याविषयीची भूमिका विशद केली.कार्यक्रमास
मा.वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वायाळ, केंद्रप्रमुख विष्णू बागल, मुख्याध्यापक
राजाराम बोराडे,साधन व्यक्ती संतोष गिऱ्हे, संदीप इंगोले, शाळेतील शिक्षक अविनाश लोमटे, शिक्षिका सुषमा शेळके, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, मा.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी, पालकवर्ग, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अविनाश लोमटे यांनी केले.
=======
वडिलांचे छत्र हरवलेली
विद्या प्रेमसिंग राठोड ( नववा), नाशिक येथील वीटभट्टी कामगारांचा मुलगा
राहुल अशोक गवळी, वडिलांचा आधार हरवलेला पवन प्रेमसिंग राठोड ( पाचवी),स्वप्नील संजय आढे ( पाचवी), वीट भट्टी कामगारांची मुलगी
निशिता अशोक गवळी
(तिसरी) वडीलाचा आधार गमावलेला यश पवार (पहिला) अशा चार अनाथ आणि दोन स्थलांतरित पालकांची मुले यांचे शैक्षणिक पालकत्व घेत मदत देण्यात आली.