सिद्धेश्वर काकडे यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडुन दखलभंडारा जिल्हा बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार
जालना समाधान खरात
भंडारा जिल्हा बलात्कार प्रकरणात मनसेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन नियमीत सक्रीय रहाणारे मनसे विद्यार्थी सेनेचे नेते सिद्धेश्वर काकडे यांनी लक्ष घालत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री.श्री. एकनाथ शिंदे यांना काल दिनांक 5 ऑगस्ट रोजी पाठवले
या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तातडीनं दाखल घेत सदरील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरीता आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकार्याची नियुक्त करत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्याचे आदेश काढले आहे. पिडीत महिला हि आपल्या पतीपासुन विभक्त होती. तसेच आपल्या बहिणींसोबत पीडीत महिलेचा वाद झाल्याने ती घरातुन बाहेर पडली होती. कन्हाळमोह जंगलात नेऊन या महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. व विविस्र करुन एका गावात सोडल्याने या घटनेमुळे संतापाची लाट ऊसळली होती. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा करावी आसी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केली होती.