छायाचित्रकार हाच खरा जीवनाचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आपल्या कलात्मकतेतून जनसामान्यांच्या व्यथा प्रकट करण्याचे मोठे माध्यम म्हणजे छायाचित्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,छायाचित्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छायाचित्रकारांचा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सत्कार


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
छायाचित्रकार हाच खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाच्या पटलावर मांडणारा खरा शिल्पकार असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
ते जालना येथे आयोजित छायाचित्रकार दिनानिमित्त छायाचित्रकारांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की जीवनाच्या सुंदर चित्रांना बरोबरच जनसामान्यांच्या व्यथा समाज पटलावर मांडण्याची महत्वपूर्ण भूमिका छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्याद्वारे टिपत असतो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घडलेल्या घटनेचे छायाचित्रण करत असतो असेही यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले
जीवनाचे अगदी सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत अनादी काळापासून तर आधुनिक युगापर्यंत छायाचित्रणाचे अन्यन्य साधारण महत्व असून, प्राचीन कलाकृतीकडे बघितल्यानंतर छायाचित्रणाचे महत्त्व आपल्या लक्षात येते आधुनिक लोकशाहीमध्ये छायाचित्रकाराच्या छायाचित्राच्या जोरावरच अनेक घटनाक्रम सत्य असत्य तपासले जातात यावरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून या छायाचित्रकाराकडे पाहिले जाते असे यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले, आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये गेल्या 40 वर्षापासून अनेक छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्याद्वारे आपण काढलेले मोर्चा असतील केलेली विधायक कामे असतील या सर्वांना न्याय देण्याचे काम केले असून त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो असे उद्गार ही यावेळी आमदार लोणीकरांनी काढले.!

दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, फोटोग्राफी या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे..!!

या कार्यक्रमाला या प्रसंगी मंचावर प्रसिध्द मराठी चित्रपट अनितेत्री विदुला बाविस्कर, मिस इंडिया सेंकड रनरच्या विजेत्या सौ.अंजली शर्मा, भाजप शहराध्यक्ष राजेशजी राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, अशोक अण्णा पांगरकर , अभिमन्यु खोतकर, बद्रिभाऊ पठाडे, गुलाबराव पाटील, अनिलजी व्यवहारे, मधुकर दंडारे, सोशल मिडिया व डीझिटल फोटोग्राफी चंद्रकांत धावडे, घुगे नाना, मोहन मिटकरी, रवि धांडे, श्याम संकुडे, वसंत चौधरी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन मधुसुदन दंडारे व सुत्रसंचालन अनिल व्यवहारे यांने केले.यावेळी छायाचित्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती...!

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....