भाजपचे जेष्ठ नेते मदनलाल शिंगी यांचे निधन
परतूर: प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते, निष्ठावंत मदनलाल भाऊ शिंगी यांचे आज दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी दिर्घआजाराने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सुपरिचित होते. रा.स्व.संघ ते भाजपच्या प्रवासात त्यांनी तालुक्यात पक्षाचे मोठे कार्य केले, आष्टी परिसरात भाजपचा बालेकिल्ला करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांनी वाट्टेल तेथे संघर्ष केला, माजी मंत्री लोणीकर यांचे समकालीन सहकारी व मित्र म्हणून ते परिचित होते. आष्टी परिसरात भारतीय जनता पक्षाला सुरुवातीच्या काळात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य त्यांनी अत्यंत निष्ठेने केले, भाजपच्या वाईट दिवसातही संकटांना नेहमीच तोंड देत पक्षकार्य अविरत केल्याचे भाजपचे त्यांचे सहकारी भगवानराव मोरे यांनी प्रतिक्रिया दिली.
जनसंघाचे पाहिले शाखा संस्थापक वयोवृद्ध भाजप कार्यकर्ते पं. जगन्नाथ शर्मा यांनी शिंगी यांच्या पक्षकार्याच्या अनेक प्रसंगांना आठवून वेदना व्यक्त केल्या.
स्व.शिंगी याना परतूर, मंठा, आष्टी वाटूर व सातोना परिसरात ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.