शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
परतूर / प्रतिनिधी हनुमंत दवंडे
शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत परतूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय चिखले, शरद भारुका, प्रभाकर सोळंके यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला
आज दिनांक 19 आगष्ट रोजी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोराडे सह मंठा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष वरकड, परतूर उपतालुकप्रमुख सुदर्शन सोळंके, विकास खरात, सुनील सुरुंग या प्रमुख नेत्यांची उपस्तीती होती. या प्रवेश सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना ऐ जे बोराडे यांनी म्हटले की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तमाम शिवसैनिकाना मान्य असून, कोणी कितीही कट कारस्थाने केली तरी शिवसेनेचे अस्तिसत्व कोणीच संपवू शकत नाही, स्व बाळासाहेबांच्या विचारांचा हा झंझावत पुढे असाच चालू राहणार असून जे गदार झाले ते भविष्यात उघडे पडतील , जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे म्हणत परतूर विभागात अनेक जण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.