आ.लोणीकर यांनी नागरतास येथे केली विविध विकासकामची पहानी, नांगरतस जालना जिल्ह्यातील धार्मिक स्थळासह महत्त्वाचे पर्यटन स्थळ
प्रतिनिधी समाधान खरात
जालना जिल्हातील श्री क्षेत्र नांगरदास हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते प्रभू रामचंदराणे येथे नांगर फिरवला होता म्हणून या ठिकाणचे नाव नांगरदास असे पडलेले आहे येथे प्राचीन काळापासून महादेवाच्या दगडी पिंड आहे व तीन मंदिर आहेत रामचंद्र रामगिरी बाबा येथे वास्तव्यास होते त्यांचे देखील येथे मंदिर आहे. पावसाळ्यात येथे महाराष्ट्रभरातून विविध पर्यटक येत असतात पावसाळ्यात येथील परिसर हिरवा वातावरण नयनरम्य असते हिरवीगार दाट झाडी पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळते पर्यटकांना साथ घालून जातो..!
माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी तंत्कालिन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस व तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे पाठपुरावा करुन 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.खऱ्या अर्थाने जालना जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर असणाऱ्या नांगर तासातील पायाभूत सुविधांचा विकास माजी मंत्री आमदार लोणीकर यांच्या माध्यमातून झाल्यामुळे या ठिकाणचे सुसज्ज असे सभागृह आसे सभागृह बांधण्यात आले. त्यासोबत येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, बलकुलर , पेवरब्लाँक व इतर परिसर सुविधा उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या भक्तगण व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या ठिकाणचा परिसर पर्यटकांना खऱ्या अर्थाने महाबळेश्वरच्या धर्तीवर शांत आणि थंड हवेचा प्रत्यय देत असतो ही गोष्ट ध्यानात घेऊन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रयत्नपूर्वक या भागाच्या विकासासाठी दोन कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मंजूर करून घेतला होता त्या निधीमधून या ठिकाणची विकासात्मक कामे पूर्ण झालेली असून येथे आठवड्यामध्ये या विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे
हजारोच्या संख्येत येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी पूर्वी फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या या ठिकाणी असलेली श्री महादेवाची मंदिर व श्रीराम गिरी बाबा यांचा मठ हे मुख्य आकर्षणाचे केंद्र असून डोंगराच्या कुशीमध्ये असलेल्या नांगरतास मध्ये जालना जिल्ह्यातील अनेक नागरिक वर्षभरात भेटी देत असतात त्यांना पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परिसर विकास सुसज्ज सभागृह शुद्ध पिण्याचे पाणी यासह इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध केला होता त्याचे काम आज घडीला पूर्णत्वास गेले असून, या कामाची पाहणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भेट देऊन केली यावेळी उर्वरित कामाच्या संदर्भामध्ये उपकार्यकारी अभियंता अभियंता व संबंधित कंत्राटदारास योग्य त्या सूचना देत त्वरेने काम पूर्ण करा असे सांगितले असून पुढील आठवड्यामध्ये या कामाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
=======================
*श्रावण मासामध्ये या ठिकाणी असते भक्तांची मांदियाळी*
=======================
श्रावणाच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात त्यामुळे या ठिकाणचा परिसर नियमितपणे भक्तगण व पर्यटक नागरिकांनी फुलून गेलेला असतो या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे सुसज्ज सभागृह त्याचबरोबर परिसराचा विकास करण्यात आला असल्याचे पत्रकार नमूद करण्यात आले असून सर्वांसाठी आल्हाददायक वाटणाऱ्या या परिसराची शोभा झालेल्या या कामामुळे आणखीनच वाढले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.यावेळी भाजपा जालना तालुका अध्यक्ष प्रकाश टकले गजानन उपाड माझी जि प सदस्य सुनील कुलकर्णी विक्रम उफाड बाळासाहेब चव्हाण महेश पवार भास्करराव राठोड पंडित जाधव शिवाजी मानकर राम चव्हाण रामेश्वर चव्हाण महेश चव्हाण प्रताप जाधव बाळू मानकर गुमन जाधव गजानन चव्हाण विक्रम उफाड स्वप्निल चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती..!!