शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,सेवा समर्पण पंधरवड्याच्या माध्यमातून जनसेवा करा - लोणीकरांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांना आवाहन,घरकुल योजनेतील परतुर शहर तसेच तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभाचे करण्यात आले वितरण*, पोखरा योजनेच्या माध्यमातून ठिबक, शेततळे नेट शेड विहीर आदीसाठी 07 कोटी 50 लक्ष रु चे विविध योजनेच्या लाभाचे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वितरण करणार
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
राष्ट्रनेता हे राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत सर्वसामान्य गोरगरीब दिन दलित शेतकरी कष्टकरी माता भगिनी व बांधवांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम प्रत्येकानं करावं त्याचबरोबर आपल्या परीने होईल तेवढी मदत सहकार्य या वंचित वर्गाला करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावे असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली
ते सेवा पंधरवड्या निमित्त आयोजित विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाची वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की आपण शेवटच्या श्वासापर्यंत गोरगरीब दीन दलितांची सेवा करणारा असून अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबर पासून तर 2 ऑक्टोंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे करावीत असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले.
पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना दिव्यांग विधवा परित्यक्ता दुर्धर आजार ग्रस्त अशा अनेक विविध लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ दिला जाणार असून परतुर तालुक्यातील प्रलंबित 2000 प्रकरने मार्गी लावण्यात येणार आहेत तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखराच्या माध्यमातून ठिबक सिंचन विहीर स्प्रिंकलर अवजार बँक नेट शेड पाईप लाईन शेततळे यासह शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांसाठी 07 कोटी 50 लक्ष रु थेट सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले
सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून आज पोखरा योजना पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना जात प्रमाणपत्र शिधापत्रिका वाटप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे धनादेश यासह अनेक जन सामान्यांचे उपयोगाचे प्रमाणपत्रे यांचे वितरण आज करण्यात आले असून सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला सेवा पुरवण्यासाठी अधिकारी कर्मचारी यासह लोकप्रतिनिधींनी काम करावे असेही यावेळी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले
दरम्यान प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत मातांना दोन लाख पंधरा हजाराचे अनुदानाचे धनादेशाचे व मानव विकास अंतर्गत बुडीत मजुरीचे 36 महिलांना 66 हजार रुपयांचे धनादेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आले
तर ट्रॅक्टर मळणी यंत्र रोटावेटर यासाठी 32 लाख रुपयाचे अनुदानाचे धनादेश यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आले
मागील सरकारच्या काळात पिक विम्याची पद्धत पूर्णपणे चुकीची होती त्यामध्ये पीक विमा कंपन्या मालक आणि सरकार मात्र चोर अशा स्वरूपाची चुकीची पद्धत होती त्यामुळे अनेकांना पिक विमा मिळाला नाही लवकरच त्या पिक विमा पद्धतीमध्ये बदल करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ कशी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती देखील यावेळी लोणीकर यांनी दिली
यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ०१ लक्ष रुपयाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले त्यामध्ये वाढोणा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अंकुश लक्ष्मण हंबीरगे यांचे वारस अनिता अंकुश हमीर्गे, कोरेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सोनाजी तुकाराम खरात यांच्या पत्नी बेबी सोनाजी खरात, दैठणा बु येथील शेतकरी गोपाळ शंकर सरकटे यांचे वारस कविता गोपाळराव सरकटे ,सुनील अश्रोबा सावंत यांचे वारस सुनीता सुनील सावंत यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा समर्पण पंधरवडा कार्यक्रमांतर्गत शेवाळे किरण विष्णू शेवाळे आप्पा विष्णू कुरेशी अमजद अब्दुल माने सानिका ज्ञानेश्वर भदर्गे रितेश दिलीप भालेराव सुमित मनोज वाघमारे अनुष्का सुरेंद्र आदींना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तर अर्चना लक्ष्मण कावळे सखुबाई बाबूजी सातपुते यशोदा अण्णासाहेब उगले कुशवार्ता बाबासाहेब काळे सुमित्राबाई गोविंद कंठाळकर यांच्यासह अनेकांना
उत्पन्न प्रमाणपत्राचे वाटप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी केले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बसये, तहसीलदार रूपा चित्रक भाजपा ता अध्यक्ष रमेश भापकर उपविभागीय कृषी अधिकारी रोडगे रंगनाथ येवले संपत टकले शत्रुघ्न कणसे सुधाकर सातोनकर, नगरसेवक प्रकाश चव्हाण नगरसेवक कृष्णा आरगडे बाबासाहेब आटोळे दिगंबर मुजमुले ओम प्रकाश मोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती