बचतगटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,वर्षभरात महिला आर्थिक महामंडळाचे परतूर मंठा दोन्ही तालुक्यांसाठी गेल्या वर्षभरात 8 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना वितरित

मंठा प्रतिनिधी- सुभाष वायाळ
ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली तर त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घरातील महिलांवर येते. अर्ध्यावर सोडलेला संसाराचा गाडा महिला स्वकर्तृत्वाने समोर नेते. अशा माताभगिनींना बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. विविध साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात व इतरही लहान लहान व्यवसायांत चांगली संधी असून, त्यासाठी महिलाभगिनींनी पुढाकार घ्यावा. महिलांच्या अशा उपक्रमाला आवश्यक ते बळ मिळवून देत आपण खंबीरपणे चांगलं काम करणाऱ्या बचत गटाच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही आज कोकरसा येथे दिली.

कोकरसा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्याव्दारे आयोजित कार्यक्रमात स्वंय सहाय्यता महिला बचत गटातील महिलांना संबोधित करताना श्री लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे तालुकाध्यक्ष सतीश राव निर्वळ राजेश मोरे पंजाब बोराडे नागेश घारे नाथराव काकडे नारायण दवणे उद्धव पवार सुधाकर सरकटे नाबार्डचे श्री क्षीरसागर उमेश कहाते विष्णू घाट प्रल्हादराव सरकटे आदिनाथ काकडे भागवत डोंगरे विष्णू चव्हाण मालता चव्हाण लता राठोड मालदा शेजुळे सुवर्णा कमळकर विश्रांती मगर संगीता पवार सुनंदा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अगरबत्ती बनवणे चिप्स बनवणे मसाला बनवणे पापड बनवणे यासह महिलांना सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होतील अशा प्रकारच्या लघु उद्योगांना चालना देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असून त्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण केव्हाही तयार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले लहान लहान उद्योगांमधून महिला सक्षम बनल्या तर कुटुंब सक्षम बनेल आणि कुटुंब सक्षम बनले तर गाव आणि पुढे देश सक्षम बनेल त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना अधिकाधिक मदत कशी करता येईल यासाठी मी यापूर्वी देखील प्रयत्नशील होतो आणि यापुढे सुद्धा राहील अशा शब्दात लोणी करणे आपण महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील व पाठीशी असल्याचे स्पष्ट केले

श्री लोणीकर यावेळी म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. बचत गटाच्या महिलांनी माविमच्या सहकार्याने आपापल्या गावात वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बचतगटातर्फे एखादा कुटीर उद्योग, ग्रामोद्योग उभारावा. त्यासाठी निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल. बचतगटांना उद्योग उभारणीसाठी बँकेद्वारे कर्ज दिले जाते. त्यासाठी नियोजन करुन लघु उद्योग उभारावा. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी प्रयत्न केला जाईल. बँकेद्वारे तालुक्यात तसेच गावांत गोदाम निर्मितीसाठी बचतगटांनी समोर यावे. जागेची व्यवस्था झाल्यास गोदाम निर्मिती देखील केली जाऊ शकते, त्यादृष्टीने बचत गटांनी प्रयत्न करावेत असेही श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात साडे ६ हजार पेक्षा अधिक बचतगट कार्यरत असून सुमारे ७० हजार महिलांचा त्यात समावेश आहे. सर्व गटांव्दारे माविमच्या दशसुत्रीचे पालन केलं जातं. या सर्व बचत गटांना आतापर्यंत २०० कोटींपेक्षा अधिक निधी वितरीत करण्यात आला असून त्यांची शंभर टक्के कर्ज परतफेडची टक्केवारी आहे. महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व योजनांचा लाभ दिला जावा यासाठी आपण कायम बचत गटांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असेही लोणीकर यावेळी म्हणाले. 
लोणीकर यांच्या हस्ते २८ लाख रुपयांचे धनादेश वाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारी सशक्तिकरणाचा प्रयत्न हा अतिशय महत्त्वाचा असून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियमितपणे पंतप्रधान महिला बचत गटांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात राज्यातील बचत गटांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नियमितपणे आग्रही असतात त्यामुळे येणाऱ्या काळात ही महिला बचत गटांना आपल्या उद्योग उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने यापूर्वी देखील आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज वाटप करण्यात आले होते तसेच आज देखील २८ लाख रुपयांचे धनादेश महिला बचत गटांना माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यामध्ये जय जीवदानी महिला बचत गट जांभरुण ४ लक्ष, ईश्वरसिंग महाराज महिला बचत गट पिंपरखेडा ३ लक्ष ४० हजार ज्ञानेश्वर माऊली बचत गट कानडी ३ लाख ३० हजार, सावित्रीबाई फुले महिला बचत गट इंचा ३ लाख २० हजार, दृपतामाता महिला बचत गट वाघाळा ३ लाख, गोपीनाथ मुंडे महिला बचत गट तळणी ०२ लाख २८ हजार, जामिया महिला बचत गट तळणी ०२ लाख ०३ हजार, ग्राम संघटन दुधा ०१ लाख, ग्राम संघटन टाकळखोपा ०१ लाख, ग्राम संघटन तळणी ०२ लाख ग्राम संघटन गारटेकी ०१ लाख, ग्राम संघटन दहा १ लाख ५० हजार असे एकूण २७ लाख ७१ हजार रुपयांचे धनादेश यावेळी श्री लोणीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी एकनाथ जाधव शंकर बांडगे बाबासाहेब जाधव राजेश राठोड गोविंदराव केंदळे शाम वाघ जितेंद्र सरकटे गजानन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते महिला बचत गटाच्या समन्वयक अध्यक्ष सचिव यांच्यासह माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....